घरदेश-विदेशसरदारांच्या पुतळ्याच्या ठिकाणी होणार रेल्वे स्टेशन

सरदारांच्या पुतळ्याच्या ठिकाणी होणार रेल्वे स्टेशन

Subscribe

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आता केवडिया शहरामध्ये रेल्वे स्टेशन उभारले जाणार आहे.

केवडिया!! गुजरातमधील छोटसं शहर. कधीकाळी या शहराचं नाव आसपासच्या भागापुरता मर्यादीत होतं. पण, आता या शहराची चर्चा देशभरात जोरात सुरू आहे. कारण, याच गावापासून ३ किमी अंतरावर उभारला गेलाय ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार पटेलांचा भव्य पुतळा. त्यामुळे या शहराला देखील आता खऱ्या अर्थानं ‘अच्छे दिन’ येणार आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढवण्यासाठी या शहरात रेल्वे स्टेशन उभारले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. केवडिया गावाची लोकसंख्या ६,७८८ ऐवढी आहे. १५ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केवडिया येथील रेल्वे स्टेशनची पायाभरणी केली जाणार आहे. पर्यटकांना ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्यासाठी सर्वप्रथम केवडिया या ठिकाणी उतरावं लागतं. या ठिकाणी पोहोचण्यासाठी थेट रेल्वे किंवा विमानाची सोय नाही.

केवडिया शहराच्या सर्वात जवळ ७१.९४ किमी अंतरावर बडोदा, ७५.३६ किमी अंतरावर भरुच आणि ७७.९५ अंतरावर अंकलेश्वर ही तीन रेल्वे स्टेशन आहेत. विमानाने जायचे असेल तर सुरत विमानतळाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रवाशाच्या दृष्टीनं पर्यटकांची गौैरसोय होते. त्यामुळे केवडिया या ठिकाणी रेल्वे स्टेशन उभारलं जाणार आहे. रेल्वे स्टेशन उभं राहिल्यानं पर्यटकांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय, परिसराच्या विकासामध्ये देखील त्याचा हातभार लागणार आहे.

- Advertisement -

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या आसपास प्रत्येक राज्याने आपापले गेस्ट हाऊस उभारावे. अशी लेखी विनंती गुजरात सरकारने सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यापैकी काही राज्यांनी त्यामध्ये रस देखील दाखवला आहे.

वाचा – ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला मिळणार रेल्वे आणि हवाई कनेक्टिव्हिटी

वाचा – ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे थेट अंतराळातून दर्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -