घरताज्या घडामोडीरद्दी विकत केंद्र सरकारने जमवले 250 कोटी; वाचा कशा प्रकारे ?

रद्दी विकत केंद्र सरकारने जमवले 250 कोटी; वाचा कशा प्रकारे ?

Subscribe

देशात सध्या स्वच्छता अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने रद्दी विकून तब्बल 250 कोटींहून अधिक रुपये जमवल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी (DARPG) विभागाचे सचिव श्रीनिवास यांनी याबाबत माहिती दिली आहे.

देशात सध्या स्वच्छता अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने रद्दी विकून तब्बल 250 कोटींहून अधिक रुपये जमवल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी (DARPG) विभागाचे सचिव श्रीनिवास यांनी याबाबत माहिती दिली आहे. (central government earns crores scrap disposal under swachhta campaign)

‘जीवन सुलभता’ सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 500 नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत सुमारे 3 लाख लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, 4500 सार्वजनिक तक्रारी कैद्यांशी संबंधित होत्या. ही मोहीम खूप मोठी आणि व्यापक आहे. जगण्याच्या सुगमतेसाठी सरकारने सुमारे 500 नियम आणि प्रक्रिया शिथिल केल्या. प्रत्येक पावलाचा भारतातील लाखो नागरिकांना फायदा झाला आहे.

विशेष मोहीम 2.0 ही 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत दूरस्थ कार्यालये, परदेशातील मिशन्स, केंद्र सरकारशी संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये आणि इतर संस्थांमध्ये आयोजित केली जात आहे.

- Advertisement -

‘स्वच्छता मोहीम 61,532 ठिकाणी राबविण्यात आली आणि कचरा विल्हेवाट लावण्यापासून 252.25 कोटी रुपये कमावले गेले आणि 34.69 लाख चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही मोहीम तीन आठवड्यात पूर्ण करणे ही मोठी कामगिरी आहे. विशेष मोहीम 2.0 गेल्या तीन आठवड्यांत मोठ्या प्रमाणावर चालवली गेली. यामध्ये हजारो अधिकारी व नागरिक सहभागी झाल्याने त्यांनी शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान राबविले आहे. यामध्ये सर्वांनी मिळून हातभार लावल्यानेच ही मोहीम यशस्वी झाली’, असे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) 1989 च्या तुकडीचे आणि राजस्थान केडरचे अधिकारी श्रीनिवास यांनी सांगितले.


हेही वाचा – या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, मनसेच्या ‘दोपोत्सवा’बाबत मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -