घरताज्या घडामोडीया भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, मनसेच्या 'दीपोत्सवा'बाबत मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती

या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, मनसेच्या ‘दीपोत्सवा’बाबत मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी हे तिन्ही नेतेमंडळी एकत्र एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी हे तिन्ही नेतेमंडळी एकत्र एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. या दीपोत्सवाच्या उद्धाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे स्पष्टीकरण दिले. (Maharashtra Cm Eknath Shinde In MNS Deepotsav at shivaji Park)

“याआधी गणेशोत्सवात आम्ही त्यांच्या घरी गेलो होते. त्यानंतर राज ठाकरेही पूर्ण कुटुंबासह आमच्या घरी आले. हा दीपोत्सव आहे. यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. तसेच, आज काही राजकीय बैठक नव्हती, कोणता असा राजकीय कार्यक्रम नव्हता. ही आपली संस्कृती आहे. आपली परंपरा आहे, यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

“दरवर्षीप्रमाणे यंदाही राज ठाकरे यांनी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवाला आम्ही हजेरी लावली. दिवाळी आहे आणि सगळ्यांनी आनंदाने साजरी केली पाहिजे. राज ठाकरे दरवर्षी सर्व नागरिकांना एकत्रित करून या शिवतीर्थावर दिवाळी साजरी करतात. त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच, ‘हा दीपोत्सव सर्वांना आनंदाचा जावो अशी’, प्रार्थना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

“गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये हा दीपोत्सवाचा कार्यक्रम होत आहे. पण मनात इच्छा असतानाही आम्हाला इथे येता आले नाही, योगायोग लागतो त्याला. चांगली सुरुवात आहे ही. तुम्ही आम्हाला मध्ये पत्रही दिले, तुम्ही भेटलातही. त्यामुळं आम्ही दोघांनीही ठरवलंय की, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला सांगितले की कधीही हक्कानं सांगा. दोघेही आम्ही अगदी उशीरापर्यंत काम करत असतो. त्यामुळं राज ठाकरे कधीही येऊ शकतात. रात्री, अपरात्री अगदी मध्यरात्री देखील, आम्ही त्यांना भेटणार. यामध्ये मी टीका करत नाही”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisement -

दिवाळी पहिला दिवस आहे. हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मनसेच्या वतीने मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले.


हेही वाचा – धर्माच्या नावावर आपण कोठे पोहोचलो आहोत? ‘हेट स्पीच’बद्दल सुप्रीम कोर्टाला चिंता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -