घरदेश-विदेश'चांद्रयान ३' मोहिमेतून वनिता मुथय्या यांना डावललं

‘चांद्रयान ३’ मोहिमेतून वनिता मुथय्या यांना डावललं

Subscribe

वनिता यांच्या बदलीचं कारण इस्त्रोने अद्यापही स्पष्ट केलेलं नाही.

‘चांद्रयान २’ या भारताच्या मोहिमेचं नेतृत्व इस्त्रोच्या दोन महिला करत होत्या. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अवकाश मोहिमेचं नेतृत्व महिलांकडे देण्यात आलं होत. वनिता मुथय्या या ‘चांद्रयान २’च्या प्रकल्प संचालक होत्या तर रितू करिधाल या मोहिमेच्या संचालक होत्या. मात्र आता ‘चांद्रयान ३’ या मोहिमेतून वनिता मुथय्या यांना डावलण्यातं आलं आहे. इस्त्रोने अद्यापही वनिता यांच्या बदलीमागचं नेमकं कारणं काय? हे जाहीर केलेलं नाही. वनिता यांच्या जागी पी. वीरामुथुवेल हे प्रकल्प संचालक असणार आहेत. तसंच रितू करिधार यांनी ‘चांद्रयान ३’साठी मोहिमेच्या संचालकपदीचं ठेवण्यात आलं आहे.

नक्की वाचा – धक्कादायक: हैदराबादच्या बलात्काऱ्यांनी आधीही ३ मुलींना जाळले होते

- Advertisement -

या बदलीची माहिती इस्त्रोने २८ नोव्हेंबरच्या पत्रकामध्ये देण्यात आली आहे. ‘वनिता मथुय्या या उत्तम शास्त्रज्ञ आहेत. ‘चांद्रयान २’च्या सध्या त्या प्रकल्प संचालिका आहेत. मात्र त्याची आता पीडीएमएसएच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तसंच ‘चांद्रयान ३’च्या प्रकल्प संचालकपदी इस्त्रोच्या मुख्यालयात कार्यरत असणारे पी. वीरामुथुवेल यांची नियुक्ती करण्यात येत आहे.’

इस्त्रोने ‘चांद्रयान २’ मोहिमेसाठी दोन महिलांची नियुक्ती केल्यामुळे मोठ्या प्रमाणात इस्त्रोचे कौतुक करण्यात आलं होत. ‘चांद्रयान २’ मोहिमेतील सर्व सिस्टिम्सची जबाबदारी ही वनिता मुथय्या यांच्याकडे होती. विक्रम लँडर हा याच सिस्टिमचा भाग होता आणि याच विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले होते.

- Advertisement -

हेही वाचा – चीनचा डाव फसला; जम्मू-काश्मीरच्या चर्चेची फेटाळली मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -