घरदेश-विदेशचांद्रयान-३: मोहिमेसाठी ६०० कोटी खर्च; २०२१ ला होणार मोहिम!

चांद्रयान-३: मोहिमेसाठी ६०० कोटी खर्च; २०२१ ला होणार मोहिम!

Subscribe

इस्त्रोची महत्वाकांक्षी योजना इस्त्रोचे अध्यक्ष डॉ.के सिवन यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर केली. बुधवारी बंगळुरूमध्ये पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. डॉ.के सिवन यांनी नव्या वर्षात चंद्रयान ३ मोहिमेबरोबरच अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमांची मालिकाच जाहीर केली. भारताचा अवकाश कार्यक्रम चौफेर विस्तारणार असल्याचे संकेत डॉ. सिवन यांच्या पत्रकार परिषदेतून दिले.

चांद्रयान-३ मोहीम सन २०२१ मध्ये होणार असल्याची अधिकृत घोषणा अध्यक्ष डॉ.के सिवन यांनी यावेळी केली. मानवरहित चाचणी, नव्या लहान रॉकेटची चाचणी, तमिळनाडूमध्ये देशातील तिसऱ्या अवकाश प्रक्षेपण केंद्राची उभारणी आणि २५ प्रक्षेपणे होणार असल्याचे डॉ.के सिवन म्हणाले. या वेळी सिवन यांनी ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान-३’ या मोहिमांची माहिती दिली. अंतराळ विज्ञानाद्वारे देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिवन यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षातच या दोन मोहिमांची तयारी करण्यात आल्याचेही सिवन म्हणाले. त्याचबरोबर चंद्रयान ३ या मोहिमेसाठी एकूण ६०० कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचेही के. सिवन म्हणाले.

- Advertisement -

चंद्रयान ३ मोहिम महत्त्वाची

२०१० मध्ये चांद्रयान २ मोहिम अयशस्वी ठरली. चंद्रावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर इस्त्रोतर्फे चांद्रयान ३ च्या रूपाने सुधारित लँडर चंद्रावर पाठवण्याचे ठरले. या विषयी बोलताना के.सिवन म्हणाले की, ‘चांद्रयान-३ च्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. चांद्रयान ३ च्या निर्मितीची तयारी सुरू असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान ३ मोहीम प्रक्षेपित केली जाईल.’ गगनयान मोहिमेसाठी ४ अंतराळवीरांना पाठवणे निश्चित झाले असून त्यांची निवडही करण्यात आल्याचे सिवन यांनी सांगितले. या अंतराळवीरांना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सन २०१९ मध्ये गगनयान मोहिमच्या कामात भारताने चांगली प्रगती केल्याचेही ते म्हणाले. गगनयान मोहिमेसाठी नॅशनस अॅडव्हायझरी कमिटीची स्थापना केली गेल्याचेही सिवन म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -