घरताज्या घडामोडीPunjab Cabinet Expansion : वकील, डॉक्टर, इंजिनिअर अन् शेतकरी, भगवंत मान यांच्या...

Punjab Cabinet Expansion : वकील, डॉक्टर, इंजिनिअर अन् शेतकरी, भगवंत मान यांच्या कॅबिनेटमध्ये कोणाचा समावेश ?

Subscribe

पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वातील कॅबिनेटचा शपथविधी समारंभ आज पार पडला. एकुण १० मंत्र्यांच्या कॅबिनेटचा शपथविधी आज पार पडला. राज्यपाल बी एल पुरोहित यांनी हरपाल सिंह चीमा, बलजीत कौर, हरभजन सिंह आणि विजय सिंगला यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. त्यासोबत लाल चंद कटारूचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रम शंकर, हरजोत सिंह बैंस यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये नवनियुक्त सरकारचे दहा जणांच्या सहभागाची कॅबिनेट तयार झाली आहे. पंजाब राजभवन येथे हा शपथविधी पार पडला. या मंत्रीमंडळात एक महिलेचाही समावेश आहे.

- Advertisement -

पंजाबमध्ये ज्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला, त्यामध्ये आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेता हरपाल सिंह चीमा हे प्रमुख आहेत. या सरकारमध्ये बलजीत कौर हे एकमात्र महिला मंत्री आहेत. एका महिला मंत्र्याचा समावेश केल्याने बलजीत कौर यांनी पंजाबच्या जनतेचे तसेच पक्ष प्रमुखांचे आभार मानले आहेत. आपले कर्तव्य इमानदारीने पार पाडेन असेही त्यांनी म्हटले आहे. एक महिला आणि डॉक्टर असतानाच महिला तसेच आरोग्य विषयावर काम करणे हे माझे उदिष्ट असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबतच आणखी ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

भगवंत मान यांच्या कॅबिनेटमध्ये २ शेतकरी, तीन वकील, दोन डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता, इंजिनिअर आणि एक व्यावसायिक तसेच काही क्षेत्रातील मोठ्या नेतृत्वाचाही समावेश आहे. क्षेत्रनिहाय संतुलन तयार करण्यासाठी या मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. आज शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये ५ मालवा, ४ माझा आणि एक दोआबा क्षेत्रातून आहेत.

- Advertisement -

आनंदपुर साहिब येथील आमदार हरजोत सिंह बैंस, दिर्बा येथील आमदार हरपाल सिंह चीमा, मलौतचे आमदार डॉ बलजीत कौर, मानसा येथील आमदार डॉ वीज सिंगला आणि बरनाला येथील आमदार गुरमीत सिंह मीत मंत्रीमंडळात आहेत. लवकरच या कॅबिनेटचा विस्तारही होणार असल्याचे कळते. आणखी सात मंत्र्यांच्या समावेश हा कॅबिनेट विस्तारात होऊ शकतो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -