घरताज्या घडामोडीचीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत

चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत

Subscribe

सध्या चीन तैवानच्या सीमेवर आपले सैन्य आणि युद्धनौका तैनातीत वाढ करत आहे.

अमेरिका आणि चीनमधील तणाव कायम आहे. चीन तैवानवर हल्ला करणार असल्याच्या शक्यतेमुळे अमेरिकेने पुन्हा एकदा आपले शक्तिशाली युद्धनौका आणि विमानवाहू जहाज यूएसएस रोनाल्ड रीगन दक्षिण चीन समुद्रावर तैनात केले आहे. चीन सध्या तैवानच्या सीमेवर आपले सैन्य आणि युद्धनौका तैनातीत वाढ करत आहे. तसेच अमेरिकन सैन्य दक्षिण चीन समुद्रात युद्ध अभ्यास करीत आहे. तर याच क्षेत्रात चीनी नौदलाचे सैन्य सराव करत आहेत. अशा परिस्थितीत हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण चीनमध्ये सुरू असलेल्या युद्ध अभ्यासाबद्दल अमेरिकेचे हवाई ऑपरेशन अधिकारी जोशुआ फगन यांनी सांगितले की, या क्षेत्रात प्रत्येक देशाने उड्डाण करावे, समुद्रातून जावे यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करण्यास मदत करावी लागेल.

दक्षिण चीन समुद्राबाबत चीनचा जपान, तैवान, इंडिनेशिया, फिलिपिन्स आणि बऱ्याच देशांसोबत वाद आहेत. चीनने या संपूर्ण क्षेत्रावर ताबा मिळवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे तैवान सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात मरीन कमांडो, लष्करी हेलिकॉप्टर आणि लँडिंग शिप्स आणि होव्हरक्राफ्ट तैनात केले आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार, चीनी सैन्य तैवानच्या नियंत्रणाखाली असलेल्या बेटांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकेल. म्हणून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी हेनान बेटावर लष्करी प्रशिक्षण सराव घेण्याची योजना आखत आहे. पीएलएच्या दक्षिणी थिएटर कमांडला या सैन्य अभ्यास आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१९४९ सालापासून चीन तैवानवर आपला दावा करत आहे. माओत्से तुंग यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाने चियांग काई शेक यांचे सरकार उलथून टाकले. त्यानंतर चियांगने तैवान बेटावर जाऊन आपले सरकार स्थापन केले आणि त्याला रिपब्लिक ऑफ चायना असे नाव दिले. त्यावेळेस चीनची नौदला सेना फारशी मजबूत नव्हती, त्यामुळे त्यांना समुद्र पार करून त्या बेटावर जाता आले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधानांचा भारतीय लष्करावर विश्वास नाही, राहूल गांधींचा मोदींवर पुन्हा निशाणा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -