घरताज्या घडामोडीएकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या, मृतदेह झाडाला लटकवला!

एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या, मृतदेह झाडाला लटकवला!

Subscribe

एकतर्फी प्रेमातून २४वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेह झाडाला लटकावणाऱ्या रिक्षाचालकाला कोनगाव पोलिसानी शनिवारी रात्री अटक केली. भिवंडीतील टाटा आमंत्रा इमारती जवळील खदानात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

किरण आकाश सावळे (२४) असे या विवाहितेचे नाव आहे. कल्याण पश्चिम येथील वाडेघर चंदनशिवेनगर येथे राहणारी किरण हिचा मृतदेह १२ ऑगस्ट रोजी कोनगाव येथील टाटा आमंत्रा इमारती जवळ असणाऱ्या खदानीत असलेल्या एका झाडाला लटकवलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. कोनगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पण झाले.

- Advertisement -

पोलिसांनी या हत्येप्रकरणी चौकशी सुरू केली असता कल्याण पश्चिम रेतीबंदर गोविंदवाडी येथे राहणारा रिक्षा चालक दीपक रुपवते (३१)याचे किरण सावळे या महिलेवर एकतर्फी प्रेम होते, किरणने त्याला लग्नासाठी नकार दिला होता तसेच त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला होता. ९ ऑगस्ट रोजी दिपकने किरणला भेटायला बोलावून टाटा आमंत्रा येथील खदानीत घेऊन आला. दिपकने पुन्हा किरणला लग्नासाठी गळ घातली मात्र तीने नकार देतात संतापलेल्या दिपकने ओढणीने किरणचा गळा आवळून हत्या केली, त्यानंतर ही आत्महत्या भासवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह तेथील एका झाडाला लटकवून तेथून पळ काढला होता अशी माहिती कोणगाव पोलिसानी दिली. याप्रकरणी पोलिसानी दीपक याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.


हे ही वाचा – भयंकर! यूपीमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप,डोळे फोडले,जिभ कापली!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -