घरदेश-विदेशचिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी

चिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी

Subscribe

चीनच्या सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी च्या काही सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना विरोध केल्यानंतर ते त्यांच्या हद्दीत परतले. चिनी सैनिकांच्या अशा घुसखोरीमुळे भारत-चीनमधील संबंध पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे.

तुम्ही भारताच्या हद्दीत आला आहात, असे भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना सांगितल्यानंतर ते त्यांच्या हद्दीत परतले. भारत-चीनमध्ये डोकलामच्या प्रश्नावरून आधीच संबंध बिघडलेले आहेत. हे संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. दिबांग व्हॅली परिसरात काही स्थानिक शिकारीसाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना भारतीय हद्दीत ११ चिनी सैनिक फिरताना दिसले. स्थानिकांनी या सैनिकांचा एक फोटोही काढला.

- Advertisement -

जून २०१७ मध्ये चीनच्या सैनिकांनी डोकलाममध्ये घुसखोरी केली होती. चीनचे सैनिक या ठिकाणी एक रस्ता बनवण्याचे काम करत होते. हे काम भारतीय जवानांनी रोखले. डोकलामवरून भारत-चीनचे जवान आमनेसामने आले होते. त्यामुळे अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ७३ दिवस तणावाचे वातावरण होते. डोकलाममधून भारताने सैन्य मागे घ्यावे, अन्यथा युद्ध अटळ आहे, अशी धमकी चीनने भारताला दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -