घरताज्या घडामोडीCWC Meeting Updates: काँग्रेसच्या CWC बैठकीत नेमकं काय झालं?

CWC Meeting Updates: काँग्रेसच्या CWC बैठकीत नेमकं काय झालं?

Subscribe

मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून जोरदार पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस पक्षात आता नेतृत्वाबाबत अस्वस्थता दिसून येत आहे. आज दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत काँग्रेसमधील नव्या-जुन्या नेत्यांमधला वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसच्या बैठकीत जाहीर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षात दोन गट दिसून आले. काँग्रेसला गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष मिळणार का? ही सुद्धा चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. त्याआधी आजच्या बैठकीत झालेल्या वादावर नजर टाकू.

काय आहे पुर्ण प्रकरण?

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर संपुर्ण पक्ष राजस्थानचे सरकार वाचविण्यात मग्न असताना दुसरीकडे पक्षातील काही वरिष्ठ नेते पक्ष नेतृत्वात बदल करण्यासाठी एक पत्र तयार करत होते. १० ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत होता. आता पुढचा अध्यक्ष कोण? यावर चर्चा सुरु झाली होती. १७ ऑगस्ट रोजी काँग्रेसमधून काढून टाकलेले नेते संजय झा यांनी सांगितले की, जवळपास १०० नेत्यांनाी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे. संजय झा यांच्या दाव्यानंतर पक्षात खळबळ माजली. त्यानंतर मीडिया प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांना याप्रकरणी सारवासारव करावी लागली.

- Advertisement -

आज बैठकीत काय झालं?

आज काँग्रेस कार्यकारीणीची बैठक सुरु असताना राहुल गांधी यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत पत्र लिहिणारे नेते भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी जाहीर ट्विट आणि फेसबुक करत हा आरोप फेटाळून लावला. मी माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीच भाजपचे समर्थन केले नाही, असे ते म्हणाले. तर गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, माझा भाजपशी संबंध उघड करु दाखवला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल. सुरुवातीला आक्रमक झालेल्या या दोन्ही नेत्यांनी नंतर आपापल्या वक्तव्यावरुन सारवासारव केली.

थोड्याच वेळातनंतर कपिल सिब्बल यांनी आपले ट्विट डिलीट केले. तर गुलाब नबी आझाद म्हणाले की, राहुल गांधीना असे काहीही म्हणायचे नव्हते. माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. मात्र या धामधुमीत राहुल गांधी यांनी कोणतेही ट्विट न करता शांत राहणे पसंत केले.

- Advertisement -

Congress CWC Meeting मध्ये देशभरातून ४० वरिष्ठ नेते सहभागी झालेले आहेत. ज्या पत्रावरुन बैठकीत रणकंदन माजले ते पत्र २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले आहे. ज्यामध्ये काँग्रेसला पुर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे. हा सर्व विवाद सुरु असताना प्रियांका गांधी मात्र राहुल गांधीचे समर्थन करताना दिसल्या. त्या म्हणाल्या की, “पक्ष जेव्हा राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील सरकार वाचविण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा नेतृत्वावर असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ठिक नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -