घरदेश-विदेशगुजरात सर्वांचा आहे; व्हायरल व्हिडिओ नंतर अल्पेश ठाकोर यांची प्रतिक्रिया

गुजरात सर्वांचा आहे; व्हायरल व्हिडिओ नंतर अल्पेश ठाकोर यांची प्रतिक्रिया

Subscribe

गुजरातमधून हजारो उत्तर भारतीय पलायन करत आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर भारतीयांवर हल्ले होत होते. आता यात क्षत्रिय ठाकोर सेनेच्या काही सदस्यांना पकडण्यात आले आहे.

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यामुळे हजारो परप्रांतियांनी राज्य सोडल्यानंतर आता या हल्ल्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे सदस्य आहेत, अशी माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे या सेनेचे प्रमुख असल्यामुळे या हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोरच असल्याचा आरोप केला जात असतानाच आता ठाकोर यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात ते कारखाने बंद करण्यासाठी लोकांना चिथावणी देत आहेत. यानंतर आता ठाकोर यांनी माध्यमांसमोर येत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

“गुजरात सर्वांचा आहे. जेवढा तो तुमचा आहे, तेवढाच माझाही आहे. जर मी कुणाला धमकावले असेल तर मी तुरुंगात जाईन”, असे स्पष्टीकरण आता अल्पेश ठाकोर यांनी दिले आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये एका १४ महिन्यांच्या चिमूरडीवर बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात हिंसाचार उसळला होता. यानंतर उत्तर भारतीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी राज्य सोडायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता अल्पेश ठाकोर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अल्पेश ठाकोर हे उत्तर भारतीयांविरोधात चिथावणीखोर भाषण देत असून स्थानिक कारखाने बंद करण्याबाबत धमकी देत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अल्पेश ठाकोर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. “शासनाने हल्लेखोरांवर कडक कारवाई केली पाहीजे. मी पहिल्या दिवसापासून शांतीचे आवाहन करत आहे. काही लोक या विषयावर राजकारण करत आहेत. माझे नाव घेऊन काही लोक मला बदनाम करत आहेत.”, अशी प्रतिक्रिया ठाकोर यांनी दिली आहे.

- Advertisement -

हे वाचा – ५० हजार उत्तर भारतीयांना गुजरातमधून हाकलले

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील हल्ल्यांचा निषेध केला आहे. या हल्ल्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण जबाबदार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. गुजरातमधील कारखाने बंद होत असून बेरोजगारी वाढीस लागली आहे. त्यामुळेच तरुणांमध्ये नैराश्य आणि धुसफुस वाढीस लागली आहे.

मागच्या वर्षी गुजरात निवडणुकीत जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल हे प्रसिद्धिच्या केंद्रस्थानी होते. भाजपविरोधात तिघांनीही एकत्र दंड थोपटले होते. मात्र उत्तर भारतीयांवरील हल्ल्यानंतर आता तिघांमध्ये मतभेद झाल्याचे समोर येत आहे. हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांनी हल्लेखोरांचा निषेध केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हार्दिक पटेल यांनी उत्तर भारतीयांना दिलासा देण्यासाठी स्वतःचा मोबाइल नंबर देऊ केला आहे. हल्ल्याची घटना कुठेही घडल्यास मला संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -