घरCORONA UPDATEbooster dose : बूस्टर डोस केव्हा मिळणार? कोरोना लसीकरणावर राहुल गांधींचा सवाल

booster dose : बूस्टर डोस केव्हा मिळणार? कोरोना लसीकरणावर राहुल गांधींचा सवाल

Subscribe

देशात कोरोना महामारीचे संकट आता कुठे नियंत्रणात येत असतानाच ओमिक्रॉन व्हेरिएंटने या संकटात आणखी भर घातलीय. गेल्या काही दिवसांपासून देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा चिंतेत आहे. एकीकडे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनविरोधी लसीकरण वेगाने सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लसीकरण संथ गतीने सुरु असल्याचे म्हणत या बूस्टर डोससंदर्भात सवाल उपस्थित केलेय. “देशातील एकूण लोकसंख्येच्या बहुतांश लोकांना लस मिळालेली नाही. यात बूस्टर डोस केव्हा मिळणार?’ असं म्हणत त्यांनी लसीकरण आकडेवारीचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर केलाय.

- Advertisement -

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. यादरम्यान लसीकरणाची मागणी करण्यात आली. वाढती रुग्णसंख्या पाहता भारतात लसीकरण मोहिमही वेगाने सुरु झाली. लसीकरणामुळे रुग्णसंख्या कुठेतरी कमी होतेय अशी आशा असतानाच देशात दक्षिण आफ्रिकेच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला. ओमिक्रॉनचे अनेक रुग्ण आता भारतात आढळून येत आहेत.

सध्या देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २१३ वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण म्हणजे ५७ रुग्ण एकट्या दिल्लीत आहेत. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढतेय. यामुळे भारतात कोरोना संक्रमण १८ टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३.४७ कोटी झालीय. गेल्या २४ तासात भारतात कोरोनाचे एकूण ६,३७१ नवे रुग्ण आढळून आले.


दिल्लीमध्ये कोरोना रूग्णांच्या अहवालाची होणार जीनोम सिक्वेंसिंग, ओमिक्रॉनमुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -