घरदेश-विदेशकाँग्रेसच्या तारणहार! पंतप्रधानपद नाकारून सोनिया गांधींनी सांभाळली होती पक्षाची कमान

काँग्रेसच्या तारणहार! पंतप्रधानपद नाकारून सोनिया गांधींनी सांभाळली होती पक्षाची कमान

Subscribe

सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ राहिलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने दोनवेळा सरकार स्थापन केली. यावरून त्यांच्या नेतृत्त्वाचा अंदाज लावता येतो.

नवी दिल्ली – देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला बुधवारी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळाला. तब्बल २४ वर्षांनंतर बिगर गांधी कुटुंबातून काँग्रेसला अध्यक्ष मिळाला आहे. शशी थरुर या ज्येष्ठ नेत्याचा मोठ्या फरकाने पराभव करत मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षपदाची खुर्ची मिळवली. काँग्रेस पक्षातील हा सर्वांत मोठा अंतर्गत बदल आहे. काँग्रेसचे नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न सुरू असताना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात दिल्याने पक्ष आता कात टाकण्याची शक्यता आहे. यातून पक्षाला नवी उभारी मिळू शकते असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र, सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ राहिलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने दोनवेळा सरकार स्थापन केली. यावरून त्यांच्या नेतृत्त्वाचा अंदाज लावता येतो.

हेही वाचा – २४ वर्षांनी पक्षाच्या प्रमुखपदी बिगर गांधी चेहरा खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. तसंच, भाजप लाटेमुळे पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज होती. अशा काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वावर अनेकांनी शंकाकुशंका घेतली. तसंच, त्यांच्या परदेशी असण्यावरूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, पक्षाच्या वाईट काळात सोनिया गांधी यांनीच मोठी जबाबदारी पार पाडली आहे. एवढंच नव्हे तर पंतप्रधानपदाची लालसा मागे सोडून त्यांनी पक्षाचा विचार केला आणि पंतप्रधानपद मनमोहनसिंग यांच्या ताब्यात दिलं.

२००४ मध्ये काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी हात टेकले होते. भाजपाची लाट सुरू झाली होती. अटलबिहारी वाजपेयी पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता होती. अशा काळात सोनिया गांधींच्या मनात वेगळंच सुरू होतं. १९९८ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अवघ्या सहा वर्षांत त्यांनी राजकीय रणनीती शिकून घेतली. पक्षातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांच्या विचारधारेला आव्हान देत त्या विचार करत होत्या. यासाठी त्यांनी जागतिक नेत्यांच्याही गाठीभेटी सुरू केल्या. या भेटीत लोकसभा निवडणुकीची रणनीतीही ठरवली. निवडणूक प्रचार कसा करावा यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार स्थापन झाले. अटलबिहारी वाजपेयींसारखा दिग्गज आणि लोकप्रिय नेता असूनही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. सोनिया गांधींची ही चाल सर्वांनाच अवाक् करून गेली.

- Advertisement -

हेही वाचा – खरगे यांच्या पुढील आव्हान..

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विजयानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला तो म्हणजे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त त्यांनी हरकिशन सिंग सुरजीत यांची भेट घेतली, जे त्यावेळी आजारी होते. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी सोनिया गांधी यांचं नाव पुढे आलं. मात्र, त्यांनीही विरोध केला. मी पंतप्रधान झाले तर अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका घेत त्यांनी पंतप्रधान पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, मनमोहन सिंग हे या पदावर विराजमान झाले.

२००२ साली अध्यक्षपदासाठी आव्हान

२००२ साली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आव्हान देण्यात आले होते. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत जितिन प्रसाद यांना 94, तर सोनिया गांधी यांना 7700 मते मिळाली. असे असतानाही सोनिया गांधी यांनी जितिन प्रसाद यांना पक्षाच्या कार्यकारिणीत समाविष्ट केले. शरद पवार, पी. संगमा आणि तारिक अन्वर यांसारख्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. मात्र, त्यांच्या नेतृत्त्वामुळे २००२ साली काँग्रेसने सत्ता काबिज केली होती, असं राजकीयतज्ज्ञ सांगतात.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -