घरCORONA UPDATE'भाजपने आमदार खरेदीपेक्षा, व्हेंटिलेटर खरेदी केली असती तर...'; काँग्रेसचा टोला

‘भाजपने आमदार खरेदीपेक्षा, व्हेंटिलेटर खरेदी केली असती तर…’; काँग्रेसचा टोला

Subscribe

सध्या राजस्थानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुन्हा एकदा देशातील दोन महत्त्वाचे पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले गेले आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड करत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांविरोधातच वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही प्रत्युत्तर देताना सचिन पायलट यांच्यासंबंधीत काही गौप्यस्फोट केले आहे. यामध्ये सचिन पायलट भाजप सोबत मिळून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजप पैशाचे आमिष देऊन आमदार फोडत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवर भाजपने आमदार खरेदीपेक्षा व्हेंटिलेटर खरेदीवर लक्षकेंद्रीत केले असते, तर कित्येक रूग्णांचे प्राण वाचले असते, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये –

भाजपाने जर आमदार खरेदी करण्याऐवजी व्हेटिंलेटर्स खरेदी करण्याकडे लक्ष दिलं असतं, तर करोनातून हजारो भारतीयांचे प्राण वाचवता आले असते, असे म्हणत काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.

- Advertisement -

देशासह जगभरात कोरोनाचे संकट आहे. भारतातही आतापर्यंत हजारो रूग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशाची आरोग्य व्यवस्था भक्कम नसून भाजप सरकार कोरोना संकट हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप आजवर काँग्रेस नेत्यांकडून वारंवार झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने जर व्हेंटिलेटर खरेदी करून रूग्णांची व्यवस्था केली असती तर मोठी सोय झाली असती, असे काँग्रेसने या ट्विटमधून खोचकपणे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांची बदनामी; पोलिसात गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -