घरदेश-विदेशअन्यथा पुढील ५० वर्षे काँग्रेस विरोधातच बसेल; गुलाम नबी आझाद यांचा पलटवार

अन्यथा पुढील ५० वर्षे काँग्रेस विरोधातच बसेल; गुलाम नबी आझाद यांचा पलटवार

Subscribe

जर पक्षांतर्गत निवडणुकीत निवडून आलेल्या नेत्याने नेतृत्व केले, तरच काँग्रेस पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करु शकेल, अन्यथा पुढील ५० वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांविषयी काँग्रेसमध्ये विरोधाची भावना निर्माण झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली असून, सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्र लिहिलेल्या नेत्यांविरूद्ध बोलणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले गुलाम नबी आझाद

ज्या कोणी व्यक्ती आमच्या या प्रस्तावाचा विरोध करत आहेत तो केवळ आपलं पद जाऊ नये यासाठी करत आहेत. जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षाही उत्तम होईल. अन्यथा पुढील ५० वर्षेदेखील काँग्रेस विरोधकांच्याच भूमिकेत दिसेल. तुम्ही जेव्हा एखादी निवडणूक लढता तेव्हा कमीतकमी ५१ टक्के मतं तुमच्या बाजूने असतात आणि पक्षात केवळ तुम्ही २ ते ३ लोकांच्या विरोधात निवडणूक लढवता. ५१ टक्के मते मिळणाऱ्या व्यक्तीचीच त्या पदावर नियुक्ती केली जाते. जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल, एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे.

हेही वाचा –

विठुरायाच्या चरणांवर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -