घरताज्या घडामोडीपुणे : चारित्र्याच्या संशयावरुन दुसऱ्या पत्नीची हत्या; पतीला अटक

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन दुसऱ्या पत्नीची हत्या; पतीला अटक

Subscribe

चारित्र्याच्या संशयावरुन दुसऱ्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याच्या घटना वारंवार घडत असताना, अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या भेकराईनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव अपर्णा महाडिक (३६) असून हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव सुरेंद्र साळुंखे (४२) आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; आरोप सुरेंद्र साळुंखे व्यावसायिक असून काही वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते. त्यानंतर त्याची अपर्णा महाडिकसोबत ओळख झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले आणि दोघांनी लग्नही केले. मात्र, आरोपी सुरेंद्र याच्या दोन्ही पत्नी वेगळ्या ठिकाणी राहत होत्या. दुसरी पत्नी अपर्णा ही घरकाम करत होती. दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करण्यास सुरेंद्रचा विरोध होता. तसेच सुरेंद्र सतत अपर्णाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. त्यातूनच आरोपी सुरेंद्रने दुसरी पत्नी आपर्णाचा गळा दाबून खून केला.

- Advertisement -

या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, काही तासांतच हडपसर पोलिसांनी आरोपी सुरेंद्रला अटक केली. चौकशी केली असता खून आपणच केल्याची कबूली त्याने दिली आहे. या घटनेचा तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे करत आहे.


हेही वाचा – आडगाव पोलिसांकडून ७२ वाहने मूळमालकांना मिळणार परत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -