घरमहाराष्ट्रविठुरायाच्या चरणांवर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

विठुरायाच्या चरणांवर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

Subscribe

विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास आमचा ठाम विरोध राहील, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र आता राज्य सरकारने राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील दर्शनाबाबत वेगळीच भूमिका वारकरी संप्रदायाने घेतल्याचे समोर आले आहे.

अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरण्यास विरोध

देशासह राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिली मात्र त्या मंदिराबाहेर भाविकांना किंवा येणाऱ्या प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझर वापरणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तसेत मंदिराबाहेर तशी व्यवस्था असणं बंधनकारक केले आहे. यादरम्यान पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर येथे विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास आमचा ठाम विरोध राहील, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.

- Advertisement -

१ लाख वारकरी करणार आंदोलन 

तसेच सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आक्रमक होऊ लागले आहेत. यासह विश्व वारकरी सेना वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने १ लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशासंदर्भात आंदोलन करणार आहे. भाजपनेही या मुद्द्यावर राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारले असल्याचे देखील सांगितले जात आहे. अशावेळी सरकारचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

…म्हणून सॅनिटायझर फवारण्यास विरोध!

इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात माऊलीच्या चरणांवर डोकं ठेऊन दर्शन घेतले जाते. मात्र चरणांवर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखाद्या कोरोनाबाधित भाविकाने विठुरायाच्या चरणांवर माथा टेकून दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकालाही कोरोना संसर्गाची भीती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर मारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविला आहे.


मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिका आणि मुंढेंची बदली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -