घरताज्या घडामोडीLive Update:  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढील १२ तासात धुळीचे वारे...

Live Update:  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढील १२ तासात धुळीचे वारे वाहण्याची हवामान विभागाची शक्यता

Subscribe

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढील १२ तासात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई ठाण्यात सुमारे 20-30 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


हरलो तरी घाबरायचे नाही, बघू किती दिवस हरणार, पण लढणार – मुख्यमंत्री

- Advertisement -

 

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची निती – मुख्यमंत्री

- Advertisement -

कोरोनाची लाट येत राहिल मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही. राज्यात शिवसेनेची लाट आणा – मुख्यमंत्री


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद


राज्यात आज एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद नाही. तर 40,805 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.


पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांची भिती वाटते – संजय राऊत


मुंबईत गेल्या 24 तासात 2,550 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 13 जणांचा आज मृत्यू झाला असून, 217जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


 

थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी साधणार संवाद


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. माझगाव येथे महाराणा प्रताप यांचा मुंबई पालिकेकडून अश्वारुढ पुतळा तयार करण्यात आला या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन उपस्थित राहून अनावरण आणि लोकार्पण केले.


लवकरच सुभाष चंद्र बोस यांचा ग्रेनाइड पुतळा उभारणार – मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचे अनावरण


वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज सायंकाळी अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.  मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर  किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.


आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी साधणार संवाद


1ऑगस्टपासून 31 डिसेंबरपर्यंत डिसले गुरुजींना रजा मंजूर


उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण


भारतात आता ओमिक्रॉन कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात आहे.


नागपुरात एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याकर्त्यांचे केंद्राबाहेर आंदोलन सुरू आहे.


आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली.


महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाले की, ‘जबतक चाँद, सूरज है, तबतक हमारे बाळासाहेब ठाकरेंका नाम है. बाळासाहेबांनी जे करून ठेवले आहे, ते नुसत देशात, महाराष्ट्रात, मुंबईत नाही, तर अख्ख्या जगात त्यांची नोंद घेतली गेली आहे. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा जो पूर्णकृती पुतळा बसवला आहे, तिथे आम्ही आता जात आहोत.’


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. मोदी म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारे उत्कृष्ट नेते म्हणून ते कायम स्मरणात राहतील.’


देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ५२५ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ५९ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


ओमिक्रॉनच्या निर्बंधांमुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी लग्न रद्द केले.


पुन्हा एकदा आज, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर हा मेगाब्लॉक असणार आहे. काल, शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजून वीस मिनिटांनी डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगाब्लॉकला सुरुवात झाली असून रविवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तसेच अप फास्ट मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल दुपारी बारा वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि २ वाजून ३० मिनिटांनी संपेल. या १४ तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धिम्या मार्गिकेवर लोकल धावतील.


शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६वी जयंती आहे. यानिमित्ताने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करणार आहेत. बऱ्याच दिवसांनंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहे. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -