घरताज्या घडामोडीIndia Corona Update: देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट; २४ तासांत ३,३३,५३३...

India Corona Update: देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट; २४ तासांत ३,३३,५३३ नव्या रुग्णांची नोंद, ५२५ जणांचा मृत्यू

Subscribe

देशातील पॉझिटिव्हिटीचा रेट १७.७८ टक्के इतका झाला असून सध्या २१ लाख ८७ हजार २०५ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या शुक्रवारी २१ जानेवारीला ३ लाख ४७ हजार २५४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. त्यानंतर काल, शनिवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊन ३ लाख ३७ हजार ७०४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आजही देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट होऊन २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ५२५ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ५९ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

देशातील पॉझिटिव्हिटीचा रेट १७.७८ टक्के इतका झाला असून सध्या २१ लाख ८७ हजार २०५ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात १ अब्ज ६१ कोटी ९२ लाख ८४ हजार २७० एवढे लसीकरण पार पडले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये आढळत आहेत. शनिवारी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये ४० हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ३ कोटी ९२ लाख ३७ हजार २६४
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ८९ हजार ४०९
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ६५ लाख ६० हजार ६५०
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २१ लाख ८७ हजार २०५
देशातील एकूण चाचण्याची संख्या – ७१ कोटी ५३ लाख ७५ हजार ४२५
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ६१ कोटी ९२ लाख ८४ हजार २७०

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine : कोरोनातून बरे झाल्यानंतर किती महिन्यांनी घ्यावा डोस, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -