घरताज्या घडामोडीCoronavirus: इम्युनिटी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे काय आहे कनेक्शन? काय सांगितले एक्सपर्टने...

Coronavirus: इम्युनिटी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे काय आहे कनेक्शन? काय सांगितले एक्सपर्टने वाचा

Subscribe

देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (बुधवार) पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी सांगितले की, ‘ज्याप्रकारे कोरोना व्हेरियंट बदलत आहे, त्या हिशोबाने आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहिले पाहिजे. पण कोरोनाची तिसरी लाट केव्हा येईल याबाबत आम्ही सांगू शकत नाही, परंतु ही लाट नक्की येईल. आपल्याला यासाठी तयार राहावे लागेल. तसेच लस प्रभावी आहे. परंतु आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये अपग्रेड करावे लागेल.’

विजय राघवन पुढे म्हणाले की, ‘काही वेळेला असे घडते जेव्हा व्हायरस इम्युनिटीला वेगाने नष्ट करू शकत आहे. इम्युनिटीमुळेही संक्रमण होऊ शकते. कारण व्हायरस प्रत्येक लाटेमध्ये आपले रुप बदल आहे. पहिल्यांदा प्राण्यांमध्ये पसरला, त्यानंतर माणसात आला आणि त्याचे व्हेरियंट बदलले. आताही व्हेरियंट बदलत आहे. पहिल्या लाटेमध्ये याचे इतके व्हेरियंट नव्हते, जितके दुसऱ्या लाटेमध्ये आढळत आहेत. पहिल्या लाटेत इम्युनिटीमुळे संक्रमण कमी झाले होते. परंतु आता इम्युनिटी कमजोर झाली आहे. त्यामुळे जे पहिले बाधित झाले होते, त्यांना पुन्हा कोरोना संक्रमण होत आहे. कमी इम्युनिटी आणि सावधगिरी न बाळगणे हे दुसरी लाट येण्याचे कारण आहे. तसेच दुसरी लाट येण्यामागे व्हायरसचे रुप बदलणे मोठे कारण आहे. जगभरात प्रत्येक महिन्याला व्हायरसचे दोन व्हेरियंट समोर येत आहेत. जसजसे लसीकरण वाढले, तसे व्हायरस नवीन रुप धारण करेल. यासाठी देखील तयार राहावे लागेल.’

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने तीन वाईट, एक चांगली बाब सांगितली 

पहिली वाईट बाब – देशातील १२ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहे. तर ७ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाख सक्रिय रुग्ण असून १७ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जवळपास दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत

दुसरी वाईट बाब – देशात २४ असे राज्य आहेत, जिथे पॉझिटिव्हीटी रेट १५ टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे येथे प्रत्येक १०० चाचणीमध्ये १५ हून अधिक पॉझिटिव्ह आढळत आहेत. सर्वात जास्त पॉझिटिव्ह रेट ४८ टक्के गोव्यात आहे.

- Advertisement -

तिसरी वाईट बाब – कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, हरयाणा, राजस्थान, ओडिसा, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये कोरोना संक्रमण वेग वाढत आहे.

चांगली बाब – महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, झारखंडसह १२ राज्यांमध्ये संसर्गात थोडीशी घट झाली आहे. लव अग्रवाल म्हणाले की, केस कमी होण्याचा अर्थ असा नाही निर्बंध शिथिल केले जावे. कारण एका दिवसाचा हलगर्जीपणा आपल्याला मागील स्थितीत परत घेऊन जाऊ शकतो.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात २४ तासांत ९२० जणांचा मृत्यू; ५७,६४० नव्या रुग्णांची नोंद


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -