घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: गेल्या २४ तासात मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ, ६२ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: गेल्या २४ तासात मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ, ६२ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या वाढली

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत होती. मुंबई कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असताना आज मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून आले आहे. आज मुंबईत ३ हजार ८७९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही दिवसात वाढली होती. मात्र आज केवळ ३ हजार ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत दिवसाला नोंद होणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्याला रुग्णांची संख्या अधिक असते मात्र आज कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मुंबईत आज ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ही १३ हजार ५४७ इतकी आहे.


मुंबईता रिकव्हरी रेट हा काल ९० टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. मुंबईत २८ एप्रिल ते ४ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा द.५४ टक्के इतका आहे. कालही मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या वाढली होती. आजही कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत सध्या १०२ सक्रिया कंटेनमेंट झोन आहेत. तर ७२८ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईतील लसीकरण प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. माझी मुंबई आपली बीएमसी या पालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅल्डलवरुन मुंबईत होणाऱ्या लसीकरणाविषयी वेळोवेळी माहिती दिली जात आहे. मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलात आज शिस्तबद्धपद्धतीने कोरोना लसीकरण करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरणासाठी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येते. त्याचप्रमाणे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर ओळखपत्र घेऊन जाणे गरजेचे आहे


हेही वाचा – Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात २४ तासांत ९२० जणांचा मृत्यू; ५७,६४० नव्या रुग्णांची नोंद

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -