घरदेश-विदेशCoronaVirus: येत्या १० जूनपासून राम मंदिराचे बांधकाम होणार सुरू!

CoronaVirus: येत्या १० जूनपासून राम मंदिराचे बांधकाम होणार सुरू!

Subscribe

राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ करण्यासाठी या पूजेचा विधी असणार असून मंदिराला भव्य बनवण्यासाठी हा पूजेचा विधी असणार आहे

अयोध्यामध्ये रामजन्मभूमी परिसरात मंदिर बांधकामाची तयारी पूर्ण झाली असून परिसरातील मंदिराचे सपाटीकरण झाल्यानंतर मंदिर बांधकामची तयारी सुरू करण्यात आली आहे. या बांधकामासाठी मंदिर परिसरात एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. त्याचप्रमाणे मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेसाठी परिसरात धार्मिक विधी देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भगवान शिव विराजमान असलेल्या परिसरात प्राचीन कुबेर टीला येथे हा कार्यक्रम होईल. १० जून रोजी महंत कमल नयन दास अन्य संतांसह मंदिराचे धार्मिक विधी होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून ही विधी सुरू झाल्यानंतर मंदिर बांधण्याचे काम सुरू होईल. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांच्यामते, लंका जिंकण्यापूर्वी भगवान रामला रामेश्वरमची स्थापना करून अभिषेक करण्यात आला, म्हणून मंदिर बांधण्यापूर्वी भगवान शशांक शेखर यांची पूजा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

तसेच मंदिराच्या बांधकामाची तयारी पूर्ण झाल्याचेही सांगितले. पुर्वीच्या असलेल्या मंदिराच्या दगडापासून हे निर्माण कार्य केले जाणार असून राम लल्ला त्याच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. परंतु यापूर्वी भगवान शशांक शेखर यांची रामजन्मभूमीतील कुबेर टीला येथे पूजा केली जाईल. त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे.

कमल नयन दास म्हणाले की, राम मंदिराचे काम सुरू झाले असून सर्व तयारी पूर्ण झाली आहेत. त्यात कोणताही विलंब होणार नाही. कोरोना महामारी संपताच मंदिर बांधकाम जोरात सुरू करण्यात येईल. १० जून रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक पूजा विधी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ करण्यासाठी या पूजेचा विधी असणार असून मंदिराला भव्य बनवण्यासाठी हा पूजेचा विधी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच २५ मार्चपासून श्री राम लल्लाची अस्थायी मंदिरात स्थापना झाली आहे. परंतु जेथे त्याला आधी बसवले गेले होते, तेथे निरंतर पूजा चालू आहे, असे देखील त्यांनी सांगितले.


लॉकडाऊनमध्ये घरी परतणाऱ्या मजुरांसाठी मोदी सरकारची मोठी योजना!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -