घरCORONA UPDATEधक्कादायक! देशात कोरोनाच्या ५४९ नवीन रुग्णांची वाढ, आरोग्यसेवा सज्ज!

धक्कादायक! देशात कोरोनाच्या ५४९ नवीन रुग्णांची वाढ, आरोग्यसेवा सज्ज!

Subscribe

आतापर्यंत ४७३ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे

मागील २४ तासात भारतात कोरोनाचे ५४९ नवीन रुग्ण आढळून आले, यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५ हजार ७३४ झाली आहे. तर आतापर्यंत ४७३ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर १६६ जणांचा मृत्यू झाला आहे.  अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, प्रेम अग्रवाल यांनी दिली.

हरियाणा येथील करनाल येथील जिल्ह्यात ‘ऍडॉप्ट या फॅमिली’ या मोहिमेअंतर्गत १३ हजार गरजू कुटुंबांना ६४ लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले, असेही अग्रवाल म्हणाले. कोरोनासंबंधी सूट (पीपीई), मास्क आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा आता सुरू झाला आहे. भारतातील २० देशांतर्गत उत्पादक पीपीईचे उत्पादन करत आहेत. १. ७ कोटी पीपीईसाठी ऑर्डर देण्यात आले आहे आणि पुरवठा सुरू झाला आहे. ४९ हजार व्हेंटिलेटर मागविण्यात आले आहेत, असेही अग्रवाल म्हणाले.

- Advertisement -

रेल्वेने २,५०० हून अधिक डॉक्टर आणि ३५,००० पॅरामेडिक्सचे कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांच्या ५८६ आरोग्य युनिट्सची साखळी,  ४५ उपविभागीय रुग्णालये,  ५६ मंडल रुग्णालये,  ८  उत्पादन युनिट रुग्णालये आणि १६ विभागीय रुग्णालये कोरोना विषाणू विरूद्ध लढा देण्यासाठी उभारण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे ८० हजार आयसोलेशन बेड उभारण्यासाठी रेल्वेने ५ हजार डबे आयसोलेशनमध्ये रूपांतरित केले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नुसार आतापर्यंत १ लाख ३० हजार नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी ५,७३४ पॉझिटिव्ह आले आहेत,  मागील १ ते दीड महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३-५ टक्के वाढली. हि संख्या वेगाने वाढलेली नाही. बुधवारी १३ हजार १४३ जणांची टेस्ट करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -