घरCORONA UPDATEमहिला नेत्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये साजरा केला वाढदिवस, निघाल्या कोरोना पॉझिटिव्ह!

महिला नेत्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये साजरा केला वाढदिवस, निघाल्या कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

उत्तर प्रदेशातील भाजपाच्याच महिला नेत्यानं या नियंमांच उल्लंघन केलं. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्येच आपल्या कुटुंबीयांसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

कोरोनापासून वाचण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात कोणालाही घराबाहेर पडण्यास बंधन घालण्यात आली आहेत. केवळ अत्यावश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सर्वांना घरातच सुरक्षित राहण्याचं आवाहनही केलं आहे. तरीही अनेक लोकं नियमांच उल्लंघन करताना दिसतात. नुकतीच भाजपच्या एका महिला नेत्याने या नियमांच उल्लंघन केल्याचे समोर आले होते. आता त्या महिलेलाच कोरोना झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपाच्याच महिला नेत्यानं या नियंमांच उल्लंघन केलं. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्येच आपल्या कुटुंबीयांसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ३ -४ दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

यामध्ये गंभीर बाब म्हणजे त्या भाजप नेत्याच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर भाजपाच्या महिला नेत्यांसह अन्य काही लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महिला नेत्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तसंच नियमांचं उल्लंघन करून काही जण या ठिकाणी जमाही झाले. क्वारंटाइन सेंटरमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याच्या वृत्तानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Coronavirus- डोनाल्ड ट्रम्प आता ‘मास्क’ नाही तर वापरणार ‘बनारसी गमछा’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -