घरCORONA UPDATEक्वारंटाईन सेंटरमध्ये 'भूत- आत्म्याची' अफवा; दोन गर्भवती महिलांना जाळण्याचा प्रयत्न!

क्वारंटाईन सेंटरमध्ये ‘भूत- आत्म्याची’ अफवा; दोन गर्भवती महिलांना जाळण्याचा प्रयत्न!

Subscribe

देशातील कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहेत. बाहेर गावात आलेल्या व्यक्तीला या क्वारंटाईन सेंटरमध्ये १४ दिवस ठेवले जाते. या १४ दिवसात त्याच्यात कोरोनाची लक्षण दिसली नाही तर त्याला घरी पाठवले जाते. नाहीतर त्याची कोविड १९ ची टेस्ट केली जाते. पण या क्वारंटाईन सेंटरमध्ये उठलेल्या अफवांमुळे गर्भवती महिलांना त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.

छत्तीसगढ मधील राजनंदगांव जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये राहणाऱ्या दोन गरोदर महिलांना भूताने पछाडलं आहे अशी अफवा उठली. लोकांनी या दोघांनी डॉक्टरकडे नेण्याऐवजी मांत्रिकाककडे आणि जाळण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीत लोकांना समजावणे प्रशासनाला फार कठीण गेले. या क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्मा आहे या अफवेमुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली.

- Advertisement -

क्वारंटाईन सेंटरमध्ये असणाऱ्या दोन गर्भवती महिला विचित्र हालचाली करत असल्याची माहिती गावातील सरपंच, सचिव, पंच व इतर ग्रामस्थांना क्वारंटाईन केंद्राने दिली. उपस्थितांनी सांगितले की २३ मेला क्वारंटाईन सेंटर,  हायस्कूल मध्ये १४ लोक ३ वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते, ज्यामध्ये दोन गर्भवती महिला मोनिका जंगेल ११ मे रोजी नागपूर व १२ मेला दिलेश्वरी साहू येथे आल्या. या दोन महिलांचे वर्तन असामान्य होते. ही माहिती मिळाल्यानंतर सरपंच, सेक्रेटरी यांनी महिलांना आरोग्य केंद्रात भरती केले आणि तपासणीनंतर दोघींनाही घरी पाठविण्यात आले.

दोन्ही महिलांची प्रकृती आता स्वस्थ आहे. यापूर्वी त्याचे कुटुंब त्यांना आरोग्य केंद्रात नेण्यास नकार देत होते. मात्र पोलिस आणि सुरक्षा दलाने समजवल्यानंतर त्यांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्याचे मान्य केले.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोनाचा काही तासात मिळणार रिपोर्ट, चाचणीही होणार केवळ २०० रूपयात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -