Breast Milk पासून तयार होणार आईस क्यूब, कोरोना रूग्णांसाठी ठरणार फायदेशीर!

Breast milk
आईचं दूध कोरोनावर उपाय

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी जगभरातून संशोधन सुरू आहे. अनेक देशात शास्त्रज्ञांना लसीवर काही प्रमाणात यशही मिळतय. हा कोरोना लवकरात लवकर नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी आता बरीच औषधही उपलब्ध आहेत. त्यामुळेच कोरोनाचे रूग्ण पुर्वीपेक्षा लवकर बरे होताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी आईच्या दुधाचा पर्याय सांगितला आहे.  कोरोनातून बरे झालेल्या महिलांच्या दुधात antibodies  तयार होतात. त्यामुळे शास्त्रज्ञांनी या दिशेने संशोधन करायला सुरूवात केली आहे.

दूधाचे आईस क्यूब

शास्त्रज्ञांच म्हणणं आहे की संक्रमित आईच्या दुधाचे बर्फाचे क्यूब बनवून रूग्णांना दिले तर त्यांच्यात अधिक प्रतिकारशक्ती तयार होईल. डच ब्रेस्ट मिल्क बँकेचे प्रमुख आणि या अभ्यासाचे संशोधक राइट सॅम म्हणतात की अशाप्रकारे तयार केलेला बर्फाचा क्यूब शोषल्यास रुग्णांच्या शरीरात antibodies तयार होतील. जेव्हा रूग्णाच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतील तेव्हा त्याचा कोरोनापासून बचाव होईल. संशोधक ब्रिट वैन कुलेन म्हणतात की, घरी कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या वृद्धांना आईस क्यूब दिले तर त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर जे रूग्ण गंभीर आहेत अशा रूग्णांनाही या आईस क्यूबचा फायदा होईल.

या अभ्यासात संक्रमित झालेल्या ३० महिलांच्या (नवजात मुलांच्या माता) दुधामध्ये संशोधकांना असे आढळले की ही अँटीबॉडीज इतकी शक्तिशाली आहेत की ते संक्रमित लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतात.

शास्त्रज्ञांनी आवाहन केले आहे की सकारात्मक आणि निरोगी अर्भक असलेल्या मातांनी १००-१०० मिलीग्राम दुध दान करा. जेणेकरून यावर मोठ्याप्रमाणावर संशोधन होऊ शकेल. यानंतर सुमारे पाच हजार महिला दूध दान करण्यासाठी पुढे आल्या आहेत. नेदरलँडमध्ये या विषयी अभ्यास सुरू आहे. या अभ्यासाचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये पुर्ण झाला होता. या दिशेने आता शास्त्रज्ञ पुढील अभ्यास करत आहेत. हा अभ्यास जर यशस्वी झाला तर कोरोनापासून वाचण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.