घरताज्या घडामोडीCoronavirus: 'या' समस्येचे निराकरण केले तर यावर्षी कोरोना, लॉकडाऊनपासून मुक्तता मिळेल: WHOचे...

Coronavirus: ‘या’ समस्येचे निराकरण केले तर यावर्षी कोरोना, लॉकडाऊनपासून मुक्तता मिळेल: WHOचे संकेत

Subscribe

जगभरातील कोरोना परिस्थितीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation -WHO) आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रायन (Dr. Michael Ryan) म्हणाले की, ‘यावर्षी कोरोनामुळे लावलेली सार्वजनिक आरोग्य आणाबाणी संपुष्टात येऊ शकते.’ जागतिक आरोग्य संघटनेने २०२०मध्ये कोरोनावर जागतिक आरोग्य आणीबाणी (public health emergency) घोषित केली होती. डॉ. रायन म्हणाले की, ‘जर गरीब आणि श्रीमंत देशांमधील लस आणि औषध वितरणामधील मोठी असमानता दूर केली तर यावर्षी कोरोना व्हायरस, त्याच्यामुळे होणारे मृत्यू, रुग्णालयात होणारे भरती आणि लॉकडाऊन रोखले जाऊ शकते.’

पुढे डॉ. रायन म्हणाले की, ‘आपण या व्हायरसला आता कधीच नष्ट करू शकत नाही. कारण हा व्हायरस आता आपल्या इकोसिस्टमचा भाग झाला आहे. जर आपण कोणती गोष्ट करू शकतो ती म्हणते आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपुष्टात आणण्याची चांगली संधी आहे.’ जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी गरीब आणि श्रीमंत देशांमधील लस असमानतेला भयंकर नैतिक अपयश म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘ही विडंबना आहे. एकाबाजूला श्रीमंत देशांमध्ये ८० टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला गरीब देशांमध्ये आता १० टक्के लोकांना लसीचा एकही डोस दिला नाही आहे.’

- Advertisement -

दरम्यान डॉ. रायन एका व्हर्च्युअल संमेलनात जागातिक नेत्यांना आणि बिझनेसमॅनना संबोधित करत होते. ते म्हणाले की, ‘कोरोनासोबत लढण्यासाठी जर आपण संसाधने आणि लसींना निष्पक्ष रुपातून जगातील प्रत्येक भागात पोहोचवले नाही तर आपल्यासाठी कोरोना महामारी अशाप्रकारे पुढे राहिल. कोरोनामुळे आतापर्यंत ५५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपल्याला लोकसंख्येच्या अर्ध्या भागाला लस पोहोचवली पाहिजे. जेणेकरून कमीत कमी लोकांना कोरोना होईल आणि यामुळे जास्त मृत्यू होणार नाही.’


हेही वाचा – corona: कोरोनावरील काही औषधांवर बंदी,तर दीर्घकाळ खोकल्यासाठी करावी लागेल ही टेस्ट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -