घरदेश-विदेश'या' रेस्टॉरंटमधील 'कोविड करी' आणि 'मास्क नान'ला खवय्यांची मागणी!

‘या’ रेस्टॉरंटमधील ‘कोविड करी’ आणि ‘मास्क नान’ला खवय्यांची मागणी!

Subscribe

हा पदार्थ सध्या चर्चेत असून सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

जगभरासह कोरोनाचा फैलावर देशभर पसरला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता मात्र त्या लॉकडाऊनच्या नियमात थोडी शिथीलता आणत काही भागात अनलॉक करून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. काही भागांमध्ये हॉटेल व्यवसायिकांनाही सर्व नियमांचे पालन करुन होम डिलीव्हरी सर्विस सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

अशा परिस्थितीत जोधपूरमधील एका रेस्टॉरंटने आपल्या ग्राहकांसाठी हॉटेलमध्ये ‘कोविड करी’ आणि ‘मास्क नान’ असा एक खास पदार्थ आणला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेली स्पेशल पदार्थ ‘कोविड करी’ आणि ‘मास्क नान’ सध्या चांगलीच चर्चेत असून सोशल मीडियावर या रेसिपीचा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या चर्चेत असणारी हा पदार्थ हे, जोधपूरमधील Vedic multi-cuisine या रेस्टॉरंटमधली… ग्राहकांच्या तब्येतीची आणि सुरक्षेची काळजी घेत स्वच्छता आणि होम डिलेव्हरी दरम्यान सर्व नियमांचे पालन करत ग्राहकांपर्यंत त्याच्या आवडीचा पदार्थ पोहोचवण्याचे हे रेस्टॉरंट कर्तव्य असल्याचे मालकाकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

‘कोविड करी’ हा मलई कोफ्त्याचा एक प्रकार असून यात कोफ्त्यांना कोविड विषाणूच्या आकारात बनवण्यात येत आहे. तर हॉटेलमध्ये मिळणारे नानही मास्कच्या आकाराचे बनवण्यात येत आहेत. कोरोनामुळे सध्या लोकं बाहेर पडण्यासाठी घाबरत असल्याने जोधपूरमधील या रेस्टॉरंटने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीचे नवीन पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे.


Eid Mubarak: भाईजानने चाहत्यांना दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा! फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -