घरCORONA UPDATEखूशखबर! २२ नोव्हेंबरपासून 'कोवॅक्सिन'ला ब्रिटनमध्ये मान्यता, कोणत्याही निर्बंधांशिवाय करता येईल प्रवास

खूशखबर! २२ नोव्हेंबरपासून ‘कोवॅक्सिन’ला ब्रिटनमध्ये मान्यता, कोणत्याही निर्बंधांशिवाय करता येईल प्रवास

Subscribe

भारत बायोटेकच्या कोरोनाविरोधी ‘कोवॅक्सिन’ लस घेतलेल्या नागरिकांना आता ब्रिटनमध्ये प्रवास करणे अधिक सुखकर होणार आहे. कारण ब्रिटीश सरकारने २२ नोव्हेंबरपासून ‘कोवॅक्सिन’ला त्यांच्या लसींच्य़ा आपत्कालीन वापराच्या यादीत समाविष्ट करण्यास मंजूरी दिली आहे. यामुळे ज्या प्रवाशांनी ‘कोवॅक्सिन’ लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते प्रवासी कोणत्याही निर्बंधाशिवाय ब्रिटनमध्ये प्रवास करु शकतील. ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनीही याबाबत ट्विट केले आहे. अॅलेक्स यांनी ट्विटमध्ये म्हटले की, २२ नोव्हेंबरपासून ब्रिटन भारताच्या कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश करणार आहे. यामुळे जे भारतीय प्रवाश्यांनी ब्रिटनमध्ये प्रवास करण्याआधी कोवॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना आता क्वारंटाइन होण्याची गरज भासणार नाही.

WHO च्या मान्यतेनंतर घेण्यात आला निर्णय

जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच स्वदेशी भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’चा आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश केला आहे. यानंतर ब्रिटनने हे पाऊल उचलले आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटनने ‘कोव्हिशील्ड’ लसीचा त्यांच्या लसींच्य़ा आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश केला होता. ब्रिटनने १८ वर्षांखालील प्रवाशांनाही दिलासा दिला आहे. या प्रवाशांना ब्रिटनमध्ये संपूर्ण लसीकरण झालेले प्रवासी मानले जाईल. तसेच, त्यांना कोणत्याही चाचणी किंवा क्वारंटाइनची गरज भासणार नाही. मात्र या प्रवाशांना त्यांच्यासोबत कोरोना चाचणी अहवाल ठेवावा लागेल.

- Advertisement -

चीनच्या सिनोवॅक आणि सिनोफार्मालाही मिळाली मान्यता

ब्रिटन सरकारने म्हटले आहे की, भारताच्या ‘कोवॅक्सिन’ लसीव्यतिरिक्त चीन निर्मित ‘सिनोवॅक’ आणि ‘सिनोफार्मा’ या लसींचाही आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश केला जाईल. या दोन्ही लसींना WHO ने देखील मान्यता दिली आहे. ब्रिटन सरकारने केलेले हे सर्व बदल २२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजल्यापासून लागू होतील.

ब्रिटन सरकारकडून प्रवासाच्या नियमात सुलभता

ब्रिटनचे वाहतूक मंत्री ग्राँट शॅप्स यांनी सोमवारी सांगितले की, प्रवासाचे नियम आणखी सोपे केले जात आहेत, १८ वर्षाखालील सर्व प्रवाशांना लसीकरण केलेले प्रवासी मानले जाईल. अशा प्रवाशांना ब्रिटनमध्ये येताच तपासणी करावी लागेल आणि संबंधित प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल. प्रवासाचे नियम सुलभ केल्यानंतर कोरोनविरोधी लस घेतलेल्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे.


Poonam Pandey : पूनम पांडेचे डोक भिंतीवर आपटले, अन् तोंडावर मारला ठोसा, तक्रारीनंतर नवऱ्याला झाली अटक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -