घरताज्या घडामोडीST worker Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, राज्य सरकारची खासगी वाहतुकीला तात्पुरती...

ST worker Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, राज्य सरकारची खासगी वाहतुकीला तात्पुरती परवानगी

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. आजही संप सुरुच ठेवल्यामुळे राज्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. नागरिकांचे आणि प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी राज्य सरकारने खासगी बस वाहतुकीला तात्पुरती परवानगी दिली आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये संप पुकारला आहे. यामुळे एसटी महामंडळालाही कोट्यावधींचा तोटा सहन करावा लागलाय. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर कारवाई करण्यात येईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. एसटीला राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. यानंतरही एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटीचे एकूण २६० डेपो बंद आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे या संपामुळे प्रचंड हाल झाले आहेत. या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी संघटना संपावर असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी सर्व खासगी बसेस, स्कूल बस आणि कंपनीच्या मलाकीच्या बस तसेच मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची तात्पूरती परवानगी देण्यात येत आहे. मात्र ही परवानगी एसटी कर्मचारी जोपर्यंत आंदोलन मागे घेत नाही तोपर्यंत लागू असेल असे पत्र परिवहन विभागाकडून जारी करण्यात आले आहे.

तर कायदेशारी कारवाई करु – अनिल परब

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केलं आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही पालन केले आहे. जर कोणी कोर्टाचा अवमान करुन एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यावर कारवाई करु असा इशारा परब यांनी दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांची विलीणीकरनाची मागणी सोडून सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतु या कामाला प्रक्रिया आहे असेही अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -