घरदेश-विदेशCovid vaccine घेण्यापूर्वी आणि घेतल्यावर काय करावे? UNICEF च्या गाईडलाईन्स जाहीर

Covid vaccine घेण्यापूर्वी आणि घेतल्यावर काय करावे? UNICEF च्या गाईडलाईन्स जाहीर

Subscribe

कोरोना व्हायरसच्या वेगाने वाढणार्‍या बाधितांमध्ये, कोरोनाची लस ही आशादायी ठरत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गादरम्यान सरकारने १ वर्षापासून १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना या लसीची मान्यता दिली आहे. एक लस घेऊन तुम्ही केवळ स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तर तुमच्या कुटुंबाचे आणि आजूबाजूच्या लोकांचेही संरक्षण करू शकता. असे असले तरी लस घेण्याबाबत अजूनही अनेकांच्या मनात शंका आहेत. मात्र, कोरोनाची लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यावर कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याबदद्ल युनिसेफच्या UNICEF कडून गाईडलाईन्स जाहीर करण्यात आली आहे.

कोरोना लस घेण्यापूर्वी काय कराल?

कोरोना लस घेण्यापूर्वी त्याबद्दल थोडी माहिती घेणं आवश्यक आहे. जसे की कोणती लस शरीरात कसे कार्य करते. कोणत्या लोकांनी कोरोनाची लक्ष आवर्जून घ्यायला पाहिजे. कोरोना संबंधित बातम्यांसाठी केवळ आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि यूनिसेफ सारख्या विश्वसनीय सुत्रांवर विश्वास ठेवा. कोरोना लसीकरण केंद्रावर जाताना मास्क लावा. आपले ओळख पत्र जवळ बाळगा. तुम्हाला कोरोनालस घेण्यापूर्वी कोणती व्याधी किंवा आजार असेल आरोग्य कर्मचाऱ्यांना याची माहिती द्या.

- Advertisement -

लस घेण्यापूर्वीच लक्षणं दिसल्यास काय कराल?

कोरोना लस घेण्यापूर्वीच लक्षणं दिसल्यास कोरोना लस घेणं आवर्जून टाळा. कोरोनाची लक्ष असतील आणि तुम्ही लसीकरण केंद्रावर गेलात, तर तुम्ही इतरांची जीव देखील धोक्यात आणू शकतात. १४ दिवसांनंतर कोरोनाचे लक्षणं नसतील तर तुम्ही कोरोना लस घेण्याचा विचार करू शकतात

लस घेतल्यावर काय करावे?

कोरोना लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसणं सहाजिक आहे. लस घेतल्यानंतर येणारा ताप किंवा अंगदुखी याचा अर्थ म्हणजे तुमचे शरीर इम्यून प्रोटेक्शन तयार करण्याचे काम करत आहे. त्यामुळे लस घेतलेल्या ठिकाणी दुखणं, हात सुजणं, थंडी वाजणे, ताप येणं,अंग जड होणं, डोक दुखणं हे लस घेतलेल्या व्यक्तीला जाणवते त्यामुळे घाबरून न जाता, काही दिवसांनी तुमची तब्येत पुन्हा साधारण झालेली दिसते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -