घरमहाराष्ट्ररेल्वे, बसेस चालू राहणार पण जिल्हाबंदीचे नियम कडक करणार - राजेश टोपे

रेल्वे, बसेस चालू राहणार पण जिल्हाबंदीचे नियम कडक करणार – राजेश टोपे

Subscribe

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तर कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र कमी झालेला नाही. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक लॉकडाउनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये रेल्वे, बसेस चालू राहणार पण जिल्हाबंदीचे नियम कडक करणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

लॉकडाउन लावून साखळी तोडावी लागेल. त्यामुळे अधिक कडक निर्बंध लावण्यात येतील. लॉकडाउन करणं गरजेचं आहे. त्याची नियमावली जाहीर होईल. मुख्यमंत्री त्याची घोषणा करतील, असं टोपे यांनी सांगितलं. या लॉकडाउनमध्ये रेल्वे, बस बंद राहणार नाही. जिल्हाबंदी केली जाईल, नियम कडक केले जातील. कुणालाही विनाकारण या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. ठोस कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. चौकशी केली जाईल, असं टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -

पंतप्रधान शेवटचा पर्याय म्हणाले, तरी महाराष्ट्राला लॉकडाउनची गरज

पंतप्रधानांनी लॉकडाउन शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलं असलं, तरी महाराष्ट्रातील सध्याच्या अशंतः लॉकडाउनच्या काळातील जी परिस्थिती आहे, ज्यामध्ये उपलब्ध बेड, उपलब्ध ऑक्सिजन, उपलब्ध मेडिसीन, उपलब्ध डॉक्टर यांचा ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वापर होत आहे. त्यामुळे वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -