घरक्रीडाIPL 2021 : हैदराबादच्या संघात मोठे बदल, मनीष पांडे आऊट, विल्यमसन इन;...

IPL 2021 : हैदराबादच्या संघात मोठे बदल, मनीष पांडे आऊट, विल्यमसन इन; पंजाबची फलंदाजी 

Subscribe

हैदराबादने अजून एकही सामना जिंकलेला नसून पंजाबला केवळ एक सामना जिंकता आला आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज दोन सामने होणार असून दुपारचा सामना हा पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये होत आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचा संघ यंदाच्या मोसमात अजून एकही सामना जिंकू शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी संघात मोठे बदल केले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचे हैदराबाद संघात पुनरागमन झाले आहे. हैदराबादने विल्यमसन, केदार जाधव आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असून मनीष पांडे, मुजीब उर रहमान आणि अब्दुल समाद यांना संघातून बाहेर केले आहे.

पंजाबनेही संघात तीन बदल केले 

हैदराबादने अजून एकही सामना जिंकलेला नसून पंजाबला केवळ एक सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या शोधात आहे. पंजाबनेही या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहे. जाय रिचर्डसन, रायली मेरेडीच आणि जलज सक्सेना यांना वगळून पंजाबने फॅबियन अ‍ॅलन, मोईसेस हेन्रिक्स आणि मुरुगन अश्विन यांना संघात स्थान दिले आहे.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -