घरदेश-विदेश'या' सुविधेसह लवकरच सुरू होणार शताब्दी आणि इतर मेल एक्सप्रेस!

‘या’ सुविधेसह लवकरच सुरू होणार शताब्दी आणि इतर मेल एक्सप्रेस!

Subscribe

स्पेशल ट्रेनचे आतापर्यंत कन्फर्म तिकिटच मिळत होते मात्र वेटिंग तिकिट मिळण्याची सुविधा देखील करण्यात येणार आहे

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या मजुरांसाठी भारतीय रेल्वेकडून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत. यानंतर देशात लवकरच शताब्दी एक्स्प्रेस सह इतर मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. तसेच लॉकडाऊनदरम्यान सुरु करण्यात आलेल्या स्पेशल ट्रेनचे आतापर्यंत कन्फर्म तिकिटच मिळत होते मात्र वेटिंग तिकिट मिळण्याची सुविधा देखील करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेशल ट्रेनमधील एसी १ कोचमध्ये २० वेटिंग तिकिट दिली जाणार असून एसी २ मध्ये ५० आणि एसी ३ मध्ये १०० सीट वेटिंगसाठी दिल्या जातील. स्लीपरमध्ये हीच संख्या २०० इतकी असेल. आरएसी कोट्यातील तिकिटं मात्र दिली जाणार नाहीत, असे देखील सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

भारतीय रेल्वेतर्फे १२ मेपासून स्पेशल ट्रेन सुरू

१२ मेपासून डिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू या ठिकाणी या स्पेशल ट्रेन भारतीय रेल्वेने मजुरांसाठी सुरू केल्या आहेत.

या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या दीड तास आधी स्टेशनवर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. स्टेशनवर प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग केले जात असून स्टेशनच्या गेटवरच सॅनिटायझर मशीनही लावण्यात आले आहे. सध्या रेल्वेने १२ ते २० मे पर्यंत सुरू असलेल्या गाड्यांची यादी दिली आहे. यामध्ये फक्त वातानुकूलित श्रेणीचे डबे असल्याचे सांगण्यात येत आहे.


श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये बाळाचा जन्म; प्रवाशांनी बोगीमध्ये केला जल्लोष!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -