घरदेश-विदेशश्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये बाळाचा जन्म; प्रवाशांनी बोगीमध्ये केला जल्लोष!

श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये बाळाचा जन्म; प्रवाशांनी बोगीमध्ये केला जल्लोष!

Subscribe

डॉक्टरांनी सहाय्यक कर्मचार्‍यांसह रेल्वेच्या बोगीतच महिलेची सुरक्षित प्रसूती केली

शुक्रवारी आग्रा फोर्ट रेल्वे स्थानकातून जाणारी श्रमिक स्पेशल ट्रेन किलकारी येथून निघाली. यावेळी ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या महिलेला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. महिलेला त्रास होण्यास सुरूवात झाल्यानंतर रेल्वेच्या डॉक्टरांनी रेल्वेच्या बोगीमध्येच महिलेची सुरक्षित प्रसूती केली. महिलेची सुखरूप प्रसुती होऊन एका गोंडस मुलीला महिलेने जन्म दिला. यावेळी प्रवाश्यांनी टाळ्या वाजवून या नवजात चिमुरडीचे स्वागत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९४१७ श्रमिक स्पेशल ट्रेन गुजरातच्या जामनगरहून बिहारमधील मुझफ्फरपूरकडे जात होती. शुक्रवारी पहाटे ४.४३ वाजता रेल्वे कंट्रोल रूमला मॅसेज मिळाला की, छपरा जिल्ह्यातील मनोहरपूरमध्ये राहणाऱ्या ममता सत्येंद्र यादव या महिलेला बाळंतपणाच्या वेदना जाणवत असल्याचे कळवले गेले, असे आग्रा रेल्वे विभागाचे पीआरओ एसके श्रीवास्तव यांनी सांगितले.

- Advertisement -

नवजात बाळाचा आवाज येता जल्लोष

दरम्यान आग्रा फोर्ट स्टेशनवर डॉक्टरांनी या रेल्वेमध्ये चढावे, अशी सूचना रेल्वे कंट्रोलकडून मिळताच डॉक्टर एस. के. सिंह हे आपल्या सहाय्यक कर्मचार्‍यांसह पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी त्या ट्रेनमध्ये चढले आणि त्या महिलेकडे पोहोचले. त्रास होत असल्याने महिलेने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्यानंतर डॉक्टरांनी सहाय्यक कर्मचार्‍यांसह रेल्वेच्या बोगीतच महिलेची सुरक्षित प्रसूती केली. यावेळी महिलेने एका मुलीला जन्म दिला. नवजात मुलीचा आवाज ऐकू येताच बोगीमध्ये उपस्थित प्रवाशांनी टाळ्या वाजवण्यास सुरूवात करून जल्लोष केला.

आई-बाळाची तपासणी केल्यानंतर प्रवासाची परवानगी

आई आणि बाळाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला पुढील प्रवास करण्याची परवानगी दिली. यानंतर, त्या महिलेस अन्न, पाणी, चहा, बिस्किटं इत्यादी देऊन आवश्यक औषधं देऊन पुढे पाठवण्यात आले. सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी ही ट्रेन आग्रा फोर्ट स्थानकावरून सुटली.


गुजरातमध्ये ‘कोरोना’बरोबर सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -