घरदेश-विदेशफार्मा उद्योगावर नवं संकट; कामगार, कच्च्या मालाचा तुटवडा

फार्मा उद्योगावर नवं संकट; कामगार, कच्च्या मालाचा तुटवडा

Subscribe

कच्चा माल आणि कामगारांची कमी यामुळे हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठा फार्मा उद्योग अडचणीत सापडला आहे. हिमाचल प्रदेशने कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा विचार केला आहे. अशात औषध कंपन्यांना कामगारांची टंचाई, ब्लॅक मार्केटींग, कच्च्या मालाचा तुटवडा यामुळे अडचणीत आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांवरील बंदी आणि चीनने उशिराने मंजूरी दिल्याने कच्च्या मालाची किंमतींचे दर तिप्पट झाले. यामुळे हिमाचल प्रदेशच्या बद्दी-बरोटीवाला-नालागड (Baddi-Barotiwala-Nalagarh BBN) औद्योगिक क्षेत्राला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका बसला. त्यामुळे आता औषध घटकांच्या किंमतींवर नजर ठेवण्यासाठी केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील टास्क फोर्स स्थापन करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

गुरुवारी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या फार्मा उद्योगाच्या प्रमुखांशी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. या उद्योगाने राज्य सरकारला वाढीव उत्पादन सुलभ करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्यास सांगितलं आहे. “आम्ही लसीकरणाचा खर्च करण्यास तयार आहोत. हिमाचलमधील संपूर्ण औद्योगिक कार्य शक्तीचं सरकारने लसीकरण करावं,” अशी मागणी हिमाचल प्रदेश ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एचडीएमए) चे अध्यक्ष राजेश गुप्ता यांनी केली आहे.

कामगारांना पुन्हा कामावर आणण्यासाठी बस सुरु करा म्हणून कंपन्यांनी सरकारला विनंती केली आहे. यासाठी आम्ही दुप्पट खर्च करण्यास तयार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

सर्वात मोठं आशिया फार्मा हब म्हणून हिमाचल प्रदेशची ओळख आहे. अमेरिकेत पाठवलेल्या ५ कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन प२की सर्वात जास्त उत्पादन हे हिमाचलने केलं होतं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -