घरदेश-विदेशपंतप्रधान, आरोग्यमंत्री आहेत पण देश रामभरोसे चाललाय; संजय राऊतांची केंद्रावर टीका

पंतप्रधान, आरोग्यमंत्री आहेत पण देश रामभरोसे चाललाय; संजय राऊतांची केंद्रावर टीका

Subscribe

देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. देशात प्रशासन देशाला पंतप्रधान आहेत, देशाला आरोग्यमंत्री आहेत पण देश रामभरोसे चाललाय, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केली आहे. गंगा-यमुनेत मृतदेह वाहताना पाहिले तर देशात कोरोनानं थैमान घातल्याचं दिसतंय, असं संजय राऊत म्हणाले.

देश रामभरोसे चाललाय. देशात सरकार आहे, प्रशासन आहे, पंतप्रधान आहेत, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्या पद्धतीने गंगा-यमुनेत मृतदेह वाहताना दिसतायत त्यावरुन देश रामभरोसेच चाललाय, असं संजय राऊत म्हणाले. प्रभूश्रीरामाच्या अयोध्येतपण लोकं मरत आहेत, असं राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरुन देखील केंद्रावर निशाणा साधला. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर खर्च करण्याऐवजी देशातली कोरोनास्थिती हाताळण्यावर भर द्या, असा सल्ला राऊत यांनी केंद्राला दिला आहे.

- Advertisement -

देशाला महाराष्ट्र मॉडेलच वापरावं लागेल

देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढायचं असेल तर देशाच्या पंतप्रधानांनी, आरोग्यमंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेलच वापरावं लागेल. याबाबत सर्वांचं एकमत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचं संक्रमण आहे, पण त्यावर नियंत्रण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चांगलं काम करत आहेत. देशात नव्हे तर जगभरातून महाराष्ट्राचं कौतुक होत आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसंच पंतप्रधान मोदींनी देखील कौतुक केलं, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान, सरकार जागेवरच आहेत, पण अस्तित्व दिसत नसल्याची टीका राऊतांनी केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -