घरदेश-विदेशबंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा अंदाज, 'या' राज्यांना धोका

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा अंदाज, ‘या’ राज्यांना धोका

Subscribe

नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआर ते यूपी-बिहारपर्यंतच्या भागात मुसळधार पावसापासून दिलासा मिळाला आहे. उत्तर भारतातून दक्षिण-पश्चिम मान्सूनचे परतीचा प्रवास जवळपास पूर्ण झाला आहे, परंतु त्याचा प्रभाव दक्षिण आणि मध्य भारतात अजूनही दिसून येत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील पुणे-ठाण्यापासून ते कर्नाटक आणि केरळपर्यंत पावसाची संततधार सुरू आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचाही अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IRCTCची प्रवाशांसाठी नवीन ऑफर; पहिल्यांदा प्रवास, मग पेमेंट

- Advertisement -

IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने मंगळवारी सांगितले की बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि आठवड्याच्या शेवटी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. IMD नुसार, पुढील 36 तासांत बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि लगतच्या पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच, 22 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी दाबाचे क्षेत्र बनू शकते.

IMD नुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळा येण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र वादळात तीव्र होण्याची शक्यता आहे, परंतु त्याची तीव्रता आणि मार्गाबाबत कोणताही अंदाज जारी करू शकत नाही. ते म्हणाले की, कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतरच आपण चक्रीवादळाबाबत अधिक माहिती देऊ शकतो. या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. राज्याने किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चेंगराचेंगरीत शेकडो लोकांनी गमावलेले इंडोनेशियातील फुटबॉल स्टेडियम उद्ध्वस्त करणार

चक्रीवादळ तयार झाल्यानंतर झारखंड, बिहार ते ओडिशासारख्या बंगालला लागून असलेल्या राज्यांच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी या राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल आणि पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा आणि संपूर्ण पश्चिम बंगालच्या आणखी काही भागांतून नैऋत्य मान्सून माघार घेण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र किनार्‍याजवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळाचे परिवलन कायम असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -