घरताज्या घडामोडीहे आहेत 'आप'च्या विजयी घौडदौडीचे खरे शिल्पकार

हे आहेत ‘आप’च्या विजयी घौडदौडीचे खरे शिल्पकार

Subscribe

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत सध्या तरी आप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्यावर जरी कौतुकाचा वर्षाव होत असला तरी भाजपसारख्या तगड्या पक्षाला आव्हान देणाऱ्या आपच्या या विजयी घौडदौडीमागे अनेक चेहरे आहेत.

पंकज गुप्ता– ‘पंकज गुप्ता’ हे आपचे राष्ट्रीय सचिव असून ते राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत. आप साठी काम करता यावे म्हणून गुप्ता यांनी एका मल्टीनॅशनल कंपनीची ४० लाख पॅकेजवाल्या नोकरीवर पाणी सोडले. समाजसेवेची खरी कास असणाऱ्या गुप्ता यांनी लोकपाल जन आंदोलनातही पडद्यामागे राहून महत्वाची भूमिका बजावली होती.
गुप्ता यांनी अलाहाबाद येथील मोतीलाल नेहरु रिजनल इंजीनियरिंग कॉलेजमधून पदवी मिळवली होती. आपसाठी निधी जमवण्याची मुख्य जबाबदारी गुप्ता यांच्यावर सोपवण्यात आली होती. व्यापारी वर्गाला आपशी जोडण्यातही गुप्ता यांनी महत्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

संजय सिंह
संजय सिंह हे आपचे प्रवक्ते असून खासदार आहेत. आपने सिंह यांच्यावर निवडणुक प्रचाराची जबाबदरी सोपवली होती. तिकीट वाटपापासून निवडणुक प्रचार आणि विरोधकांच्या राजकिय हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सिंह यांनी केले होते. ज्यामुळे आपला निवडणुकीची रणनिती आखण्यास मदत झाली होती.

दुर्गेश पाठक
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जवळचे व अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून दुर्गेश पाठक यांना ओळखले जाते. २०१४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल ज्यावेळी पंतप्रधान मोदींना आवाहन देण्यासाठी बनारसला गेले होते त्यावेळी विश्वासू व्यक्तींच्या ताफ्यात पाठकांचाही समावेश होता. दिल्लीच्या निवडणुकीत संजय सिंह, दिलीप पांडे आणि दुर्गेश या तिघांनीही निवडणूक रणनिती आखण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती.

- Advertisement -

अमानतुल्ला खान
‘अमानतुल्ला खान’ हा आपचा फायरब्रँड मुस्लीम चेहरा असून खान हे ओखला मतदारसंघाचे आमदार आहेत. ते दिल्ली वक्फ बोर्डचेही चेयरमन आहेत. याच मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांपासून सीएए व एनआरसी विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून जोरदार आंदोलन सुरू आहे. तर खान यांनीच हे आंदोलन पेटवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आपच्या आजच्या विजयी घौडदौडीत शाहीन बाग येथील मतदारांचेही मोठे योगदान आहे.

प्रशांत किशोर
केजरीवाल यांच्या आजच्या दमदार कामगिरीमागे राजकिय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ‘लगे रहो केजरीवाल’ पासून ‘दिल्ली मे तो केजरीवाल’ ही घोषवाक्य वापरुन पीके यांनी केजरीवाल व दिल्लीचे नातेच मतदारांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच जनतेच्या संवेदनांवर हात घालण्याचा मोलाचा सल्लाही पीके यांनी केजरीवाल यांना दिला होता. त्यानुसारच केजरीवाल यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले. यात वीजेचे दर, पाणी, शिक्षण, आरोग्य तपासणी या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेऊनच प्रचार करण्यात आला. ज्याचे फळ आज आपला मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -