घरदेश-विदेशपतीच्या पगारातील एक तृतीयांश हिस्सा पत्नीचा; हायकोर्टाचा निर्णय

पतीच्या पगारातील एक तृतीयांश हिस्सा पत्नीचा; हायकोर्टाचा निर्णय

Subscribe

पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे.

पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. पतीपत्नीमध्ये उत्पन्नाच्या वाटणीचा फॉर्म्यूला ठरलेला आहे. याअंतर्गत पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडेच राहायला हवे तर एक हिस्सा पत्नीला देणे अपेक्षिक आहे, असे हा निर्णय देताने दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले.

पाच महिन्यात झाले विभक्त 

दिल्लीतील दाम्पत्याचे लग्न ७ मे २००६ साली झाले होते. पती हे सीआयएसएफमध्ये इन्स्पेक्टर असून ते दोघेही १५ ऑक्टोबर २००६ ला विभक्त झाले होते. त्यांनतर महिलेने पोटगीसाठी कोर्टात केला. ही पोटगी त्यांना २१ फेब्रुवारी २००८ रोजी ठरवण्यात आली. त्या दरम्यान, पतीच्या पगाराचा ३० टक्के हिस्सा महिलेला देण्याचे ठरले. या निर्णयाला महिलेच्या पतीने कोर्टात आव्हान दिले होते. त्यानंतर पोटगी ही ३० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणण्यात आली. मात्र महिलेने या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं.

- Advertisement -

महिलेला हेही पुरवतात पैसे

पतीच्या वकिलांनी कोर्टाने पत्नीच्या खात्यात कोण कोण पैसे टाकतं, याची माहिती मागवली होती. तर वडिलही महिलेला खर्चासाठी पैसे देत असल्याचं समोर आलं. परंतु त्यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा पत्नीला ३० टक्के पोटगी देण्याचा निर्णय दिला. पतीच्या पैसे वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसार महिलेला ३० टक्क्यांच्या लाभ देण्यात यावा, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

वाचा – आला नाही गुण; केला डॉक्टरच्या बायकोचा खून!

- Advertisement -

वाचा – पगार नाही म्हणून पुजाऱ्याची भक्तांकडूनच वसुली! यमुनोत्री धाममधला प्रकार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -