घरदेश-विदेशऑनलाईन लूट करणाऱ्या मास्टमाईंड टोळीला दिल्लीतून अटक

ऑनलाईन लूट करणाऱ्या मास्टमाईंड टोळीला दिल्लीतून अटक

Subscribe

कंपनीच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये काढत ऑनलाईन लूट करणाऱ्या टोळीचा परदाफाश करण्यात आला आहे. ऑनलाईन लूट करणाऱ्या टोळीला दिल्लीतून उचले असून याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

कंपनीच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये काढत ऑनलाईन लूट करणाऱ्या मास्टमाईंड टोळीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. ही टोळी पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील विविध बॅंक खात्यातून ऑनलाईन लूट करायचे. आता पर्यंत या टोळीने ३७ लाख ७८ हजार रुपयाची लूट केली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून याच टोळीतील तीन आरोपींना या आधीच सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

असे लुटले लाखो रुपये

सातारा येथील मोलाचा ओढा या ठिकाणी अभिजात इक्विपमेंट आणि अभिजात इंजिनिअर्स या कंपनी व्यवस्थापकाच्या मोबाईलचे सीमकार्ड स्वाईप करून कंपनीच्या आयडीबीआय बॅंकेच्या खात्यातील ३८ लाखाच्या रकमेवर ऑनलाईन चोरट्यांनी डल्ला मारुन दिल्लीला फरार झाले होते. अभिजात इक्विपमेंट आणि अभिजात इंजिनिअर्स कंपनीच्या व्यवस्थापकाच्या मोबाईवर तुमचे सीमकार्ड अपडेट करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली असून सीम सुरू ठेवण्यासाठी १२१ या क्रमांकावर तातडीने फोन करा, असा मेसेज मॅनेजरला पाठवण्यात आला. त्या मेसेजमध्ये काही अन्य क्रमांकही होते. सीम बंद व्हायला नको म्हणून मॅनेजरनी तातडीने १२१ क्रमांकावर फोन केला आणि पुढील प्रक्रिया केली. ऑनलाईन भामट्यांनी त्या व्यवस्थापकाच्या सीमचा नंबर त्यांच्याकडील ब्लॅंक सीमवर कॉपी करून घेतला आणि त्यानंतर कंपनीच्या बॅंक खात्यातून ३७ लाख ७८ हजार रुपये लंपास करत कंपनीचे लाखो रुपये लुटले.

- Advertisement -

हे आहेत आरोपी

दिलशान निसार (३५), सोनु कुमार (३४), संजय शर्मा (५२), इम्तीयाज अहमद (४०) यांना अटक करण्यात आली असून याच टोळीतील अभिषेक कुमार (२०), यादविंदर सिंग (३४) आणि दिलशाद अहमद (३५) यांना सातारा पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -