घरदेश-विदेशदिल्लीच्या सीमापूरमधील एका घरात आढळली IED स्फोटकांनी भरलेली बॅग; NSG ची टीम...

दिल्लीच्या सीमापूरमधील एका घरात आढळली IED स्फोटकांनी भरलेली बॅग; NSG ची टीम घटनास्थळी दाखल

Subscribe

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला राजधानी दिल्लीतील जुनी सीमापुरी भागातील एका घरात गुरुवारी दुपारी एक संशयास्पद बॅग सापडली. या बॅगमध्ये IED हा स्फोटक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु केला आहे. NSG टीमच्या मदतीने ती बॅग निकामी केली जात आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल, बॉम्ब स्क्वाड पथक आणि एनएसजीची टीम घटनास्थळी पोहचत सर्व घटनाक्रम समजून घेत तपास करत आहेत.

स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जुनी सीमापुरी येथील एका घराची स्पेशल सेलने झडती घेतली असता त्या घरातून संशायस्पद वस्तूंनी भरलेली सील पॅक बॅग आढळून आली आहे. त्या बॅगेची तपासणी केली असता त्यात आयईडी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे NSG च्या टीमकडून ही बॅग ओपन स्पेसमधून घेऊन जात निकामी केली जात आहे.

- Advertisement -

ज्या घरातून ही बॅग सापडली त्या घरात 3 ते 4 मुले भाड्याने राहत असल्याचे सांगितले जातेय. जे सध्या फरार आहेत. दिल्लीच्या गाझीपूरमध्ये आरडीएक्स प्रकरणाचा तपास करत असताना स्पेशल सेलची टीम दिल्लीच्या सीमापुरी भागातील या घरात पोहचली होती. यावेळी त्यांनी त्या घरात संशयास्पद बॅग सापडली. अशा स्थितीत बॅगेत असलेले सील पॅक असलेल्या संशयास्पद वस्तू वेगळ्या करत निकामी केल्या जात आहेत.

- Advertisement -

यापूर्वी 14 जानेवारी रोजी गाझीपूर भाजी मंडईच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर देखील एक बेवारस बॅग सापडली होती. त्यातही एक आयईडी बॉम्ब सापडला होता. यातून दिल्लीत मोठा स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी संपूर्ण परिसराची रेकी करण्यात आली होती तसेच माहिती गोळा करून हा हल्ला करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची टीम आणि एनएसजीची टीमने घटनास्थळी दाखल होत ते बॉम्ब निकामी केला होता. जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा खोदून तो बॉम्ब निकामी करणात आला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -