घरताज्या घडामोडीड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे सप्तक्रांती एक्स्प्रेसचा अपघात थोडक्यात टळला; वाचा नेमकी घटना काय?

ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे सप्तक्रांती एक्स्प्रेसचा अपघात थोडक्यात टळला; वाचा नेमकी घटना काय?

Subscribe

दिल्लीहून मुझफ्फरपूरला जाणारी सप्तक्रांती एक्स्प्रेसचा अपघात थोडक्यात टळल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे रुळावर काम करणाऱ्या मजूरांनी रेल्वे वेगात येत असल्याचे पाहून रुळावर खांब सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर रुळावरील खांब पाहताच रेल्वे चालकाची तारांबळ उडाली.

दिल्लीहून मुझफ्फरपूरला जाणारी सप्तक्रांती एक्स्प्रेसचा अपघात थोडक्यात टळल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे रुळावर काम करणाऱ्या मजूरांनी रेल्वे वेगात येत असल्याचे पाहून रुळावर खांब सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर रुळावरील खांब पाहताच रेल्वे चालकाची तारांबळ उडाली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत अर्जंट ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली. मोतिहारी येथील कुंवरपूर चिंतामणपूर रेल्वे हॉल्ट येथे ही घटना घडली. कुंवरपूर चिंतामणपूर रेल्वे हॉल्ट हे पूर्व मध्य रेल्वे विभागातील समस्तीपूर रेल्वे विभागांतर्गत मुझफ्फरपूर-गोरखपूर मुख्य मार्गावरील एक थांबा रेल्वे स्थानक आहे. (delhi to muzaffarpur sapt kranti express major accident averted)

मिळालेल्या माहितीनुसार, पिपरा स्थानकाजवळील कुंवरपूर हॉल्टजवळ रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणादरम्यान मजुरांकडून मोठा ट्रॅक ओलांडला जात होता. त्याचवेळी सप्तक्रांती एक्स्प्रेस गाडी तेथे पोहोचली. ट्रेनचा वेग जवळपास 100 किलोमीटर होता. रेल्वे पाहून कामगारांनी पोल ट्रॅकवरच रेल्वे रुळावर फेकून पळ काढला. हा प्रकार ट्रेनच्या ड्रायव्हरच्या लक्षात आला, त्यानंतर ड्रायव्हरने कसा तरी ट्रेनचा इमर्जन्सी ब्रेक लावला. बऱ्याच प्रयत्नांनंतर गाडी थांबवण्यात चालकाला यश आले, मात्र तरीही गाडी सुमारे दोनशे मीटरपर्यंत खांबाला ओढून नेली.

- Advertisement -

यादरम्यान ट्रेनमध्ये मोठा धक्का बसला आणि आवाज येऊ लागला. ट्रेनमधील मोठा आवाज आणि हादरे यामुळे प्रवाशांमध्ये आगीची अफवा पसरू लागली, त्यानंतर घबराटीचे वातावरण निर्माण झाले आणि प्रवाशांनी घाईगडबडीत ट्रेनमधून उड्या मारल्या, त्यामुळे अनेक प्रवासी जखमीही झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मजूर रुळावर काम करत असताना रेल्वेला पुढे जाण्याचा हिरवा सिग्नल कसा देण्यात आला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. ही घटना 11.45 ची आहे. तब्बल दोन तासांनंतर या मार्गावर गाड्या सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लोकांचा मार खाण्याच्या भीतीने चोरानेच केला पोलिसांना फोन…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -