घरदेश-विदेशडेल्टा व्हेरिएंट ठरू शकतो कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण; 'या' लक्षणांपासून रहा सतर्क

डेल्टा व्हेरिएंट ठरू शकतो कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण; ‘या’ लक्षणांपासून रहा सतर्क

Subscribe

देशभरात सध्या कोरोनाने कहर केला असून अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसून डेल्टा व्हेरिएंटने देशाच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनाचा डेल्टा प्रकार खूप वेगाने पसरत असून तो अत्यंत धोकादायक आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर हा डेल्टा व्हेरिएंट तयार होतो. १० ऑगस्ट पर्यंत कोरोनाचा हा धोकादायक व्हेरिएंट भारतासह १४२ देशांमध्ये आढळला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटची ही गंभीर परिस्थिती पाहता केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट केले आहे आणि आवश्यक सुविधा आणि पावले उचलण्याचे निर्देशही दिले आहेत.

आतापर्यंतच्या सर्व कोरोना व्हेरिएंटपेक्षा दुप्पट धोकादायक आणि संसर्गजन्य कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आहे. परंतु मास्क, सॅनिटायझरचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याने मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या व्हेरिएंट भिन्न स्वरूप असले तरी नियम बदलणार नाहीत, या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी पूर्वीच्या व्हेरिएंटप्रमाणेच काळजी घेणे आवश्यक आहे.

या लक्षणांपासून रहा सतर्क

  • डेल्टा व्हेरिएंट मूळ स्ट्रेनचे बदललेले स्वरूप आहे. त्यामुळे आधीच्या व्हेरिएंटप्रमाणेच याचे लक्षणं आहेत.
  • मूळ कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे डेल्टा व्हेरिएंटमध्ये बदलली आहेत असे युनायटेड किंगडममधील डेटा दर्शवितो
  • ताप, खोकला, डोकेदुखी आणि घसा खवखवणे ही कोविडची सामान्य लक्षणे आहेत.
  • वास घेण्याची क्षमता नाहिशी होणं हे सर्वात सामान्य लक्षण बनले आहे.

असं करा बचाव

  • आजारी असाल तर घरी देखील मास्क आवर्जून लावा
  • गरज असेल तरच घराबाहेर पडा. जरी घराबाहेर पडले तर कोरोनाच्या नियमांचे पालन करा
  • सतत सॅनिटायझरचा वापर करून हाथ स्वच्छ धुवा
  • खोकताना शिंकताना तोंडावर रूमाल धरा

ना शिक्षण, ना ही कसले ट्रेनिंग, तालिबानी बनला अफगाण बँकेचा हेड

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -