घरट्रेंडिंगस्वत:शीच बडबडतात, ओरडतात! Donald Trump यांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय?

स्वत:शीच बडबडतात, ओरडतात! Donald Trump यांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय?

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी संसदेमध्ये मावळते राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या समर्थकांनी घातलेला धुडगूस आख्ख्या जगानं पाहिला आहे. त्यामुळे जगातल्या सर्वात शक्तीशाली देशामध्ये सुरू असलेला खेळ (Capitol Hill) हा जगभरातल्या सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये गंभीर खुलासा होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अधिक आक्रमक झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं समोर येत आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये तसे दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे हे दावे व्हाईट हाऊसमधल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या जबाबावर आधारित असल्यामुळे त्यामध्ये तथ्य असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध वार्तापत्र डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार खुद्द अमेरिकेतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात आणि रिपब्लिकन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये देखील ट्रम्प यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. व्हाईट हाऊसमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांच्या करकिर्दीत काम केलं आहे, त्यांनी देखील या दाव्यांची पुष्टी करणारी निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, ट्रम्प एकटे असताना स्वत:शीच बडबडतात. कधी कधी ओरडायला लागतात. कारकिर्दीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ट्रम्प यांचे कुटुंबीयांसोबतही संबंध बिघडले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील ट्रम्प यांनी पराभव स्वीकार करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांनी देखील त्यांच्यासोबत घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे हे या ठिकाणी नमूद करावंच लागेल.

- Advertisement -

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देखील ट्रम्प यांचे बदलणारे मूड जाहीर झाले आहेत. कधी ट्रम्प जाहीरपणे आपला पराभव स्वीकार करताना दिसले, तर कधी त्यांनी पुन्हा विजयाचे दावे देखील केले. नुकतेच आक्षेपार्ह टिप्पणीमुळे त्याचे फेसबुक, ट्वीटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -