घरदेश-विदेशWHO चीनच्या हातातलं बाहुलं बनलंय - ट्रम्प

WHO चीनच्या हातातलं बाहुलं बनलंय – ट्रम्प

Subscribe

जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातलं बाहुलं बनलंय, असा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी बंद केला आहे.

जागतिक आरोग्य संघटने (WHO) बद्दल लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातलं बाहुलं बनलंय, असा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी बंद केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोनाच्या संदर्भात चीनची बाजू घेत असून जगाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

ट्रम्प म्हणाले, “आम्हाला चीनमध्ये जाऊन मदत करायची आहे. मात्र, आम्ही चीनमध्ये जाऊ नये अशी जागतिक आरोग्य संघटनेची इच्छा होती. आम्ही दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेला सुमारे ५० कोटी डॉलर्स देतो, तर चीन केवळ ३.८ कोटी डॉलर्स इतकाच निधी देतो. मी लवकरच जागतिक आरोग्य संघटनेविषयी घोषणा करणार आहे, कारण जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातलं बाहुलं बनलंय. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या सर्व गोष्टींना सहमती दर्शवते, परंतु आपल्याबद्दल चिंता करीत नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मृत्यूचा धोका वाढतो


अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटना अमेरिकेकडून निधी घेऊन चीनसाठी काम करत होती. म्हणून मी लवकरच निर्णय घेणार आहे. आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचा ५० कोटी डॉलर्सचा निधी मागे घेतला आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले की ते चीनबरोबर अत्यंत कठीण काळातून जात आहेत. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी अशावेळी बंद केला आहे, जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूविरुद्ध लढत आहे. अमेरिकेचे म्हणणं आहे की जागतिक आरोग्य संघटना आणि चीनने कोरोना विषाणू जगापासून लपविला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -