घरताज्या घडामोडीविमान अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प!

विमान अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुदैवाने विमान अपघातातून बचावले आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन विमानतळावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या अगदी जवळून एक ड्रोन सारखे सदृश्य उपकरण गेले. पण सुदैवाने ट्रम्प यांच्या विमानाचा मोठा अपघात टळला. हा प्रकार विमान विमानतळावर लँडिंगच्या तयारीत असताना घडला. यादरम्यान विमानात अनेक जण होते.

माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे एअरफोर्स वन लँड होत असताना पिवळ्या आणि काळ्या रंगाचं एक उपकरण विमानाच्या अगदी जवळ आले होते. ते उपकरण विमानाच्या उजव्या बाजूला धडकणार होते. पण हा मोठा अपघात टळला. रविवारी संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने सिक्रेट सर्व्हिसकडे अहवाल मागवला आहे.

- Advertisement -

तसेच या घडलेल्या प्रकारबाबत फेडरश एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने अमेरिकेच्या वायुसेनेकडे विचारणा केली होती. सोमवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसचे मिलिटरी ऑफिस आणि एअरफोर्सच्या ८९व्या एअरलिफ्ट विंगने एका स्टेटमेंटद्वारे सांगितल की, आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डच्या माहितीनुसार, अमेरिकेत यापूर्वी ड्रोन्समुळे विमानांना अडथळा झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण यामुळे अजूनही कोणताही मोठा अपघात किंवा जखमी झाल्याची घटना घडलेली नाही.


हेही वाचा – Corona: देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे झाले पोस्टमार्टम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -