घरताज्या घडामोडीCorona: देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे झाले पोस्टमार्टम

Corona: देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे झाले पोस्टमार्टम

Subscribe

ICMR ने कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्याची परवानगी दिली.

देशात पहिल्यांच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णावर रिसर्च करण्याचा मुख्य उद्देश हा पोस्टमार्टम करण्याचा होता. जेणेकरून कोरोना विषाणू शरीरात किती काळ राहतो आणि कोण-कोणत्या अवयांवर जास्त परिणाम होतो, हे समजू शकेल.

सध्या पोस्टमार्टमसाठी परवानगी मिळवणे इतके सोपे नाही आहे. यासाठी भोपाळमध्ये असलेल्या AIIMS (ऑल इंडिया इंस्टिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) यांना ICMR (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिचर्स) कडून मंजूरी घ्यावी लागते. ही मंजूरी मिळल्यानंतर रविवारी रिसर्चच्या उद्देशाने कोरोनाबाधित रुग्णाचे पोस्टमार्टम केले गेले.

- Advertisement -

भोपाळ AIIMS ने पहिल्यांदा ICMR कडून कोरोना रिसर्चसाठी संक्रमित व्यक्तीचा मृतदेहाचे पोस्टमार्टची करण्याची मंजूरी मागितली होती. परंतु संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ICMR ने मंजूरी दिली नाही. जेव्हा भोपाळ AIIMS ने पोस्टमार्टमच्या अॅडवांस तंत्रज्ञानाची माहिती संसर्ग रोखण्याच्या उपायांसह ICMRला पाठविली तेव्हा त्यांना मंजूरी देण्यात आली. त्यामुळे रविवारी कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. यादरम्यान डॉक्टरांच्या पोस्टमार्टम टीमने पीपीई किटसह सर्व सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. भोपाळ AIIMS ने दावा केला की, ‘रिसर्चसाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्याची ही पहिलीच घटना आहे.’ तथापि, आणखी काही कोरोनाबाधित मृतदेहांवर रिसर्च केले जाईल. त्यानंतर अंतिम अहवाल तयार केला जाईल.

भोपाळच्या AIIMSचे संचालक डॉक्टर सरमन सिंह म्हणाले की, ‘पोस्टमार्टममुळे कोरोना विषाणूचा शरीरावरील होणाऱ्या परिणामांची माहिती मिळेल. तसेच संसर्ग झाल्यानंतर हृदय, फुफ्फुस, मेंदू किंवा इतर अवयवांवर कसा आणि किती परिणाम होतो याची देखील माहिती मिळू शकेल.’ फॉरेन्सिक मेडिसिनशिवाय अन्य तीन विभागांच्या पथकांनीही सुमारे दोन तास मृतदेहाचे पोस्टमार्टम केले. ज्यामुळे शरीरात विषाणूचा किती प्रभाव आहे हे समजू शकेल.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: रशियात ‘स्पुटनिक व्ही’ लस घेण्यास ५० टक्के डॉक्टरांचा नकार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -