घरदेश-विदेशखाद्यतेल झाले स्वस्त, पाहा खाद्य तेलांचे नवीन दर

खाद्यतेल झाले स्वस्त, पाहा खाद्य तेलांचे नवीन दर

Subscribe

खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या उपापयोजना

देशात सतत वाढणाऱ्या खाद्य तेलांच्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर नवे संकट उभे केले होते. मात्र केंद्र सरकारने आता खाद्य तेलांच्या किंमतीत घट करत नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पाम तेलासह सर्वच प्रकारच्या तेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. प्रति टन ११२ डॉलर्सची कपात करण्यात आली आहे. खाद्य तेलाच्या आयात शुल्कातील ही कपात गुरुवारपासून (१७ जून )पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे देशात आता स्वस्त दरात खाद्यतेल उपलब्ध होईल. केंद्र सरकारने अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी)ने याबाबतची अधिसुचना जाहीर केली आहे. .यात पात तेलाच्या आयात शुल्कात प्रतिटन ८६ डॉलर आणि आरबीडी (शुद्ध ब्लीच्ड अँड डियोडराइज्ड ) आणि कच्चे पामोलिन तेलाच्या आयात शुल्कात प्रति टन ११२ डॉलर कपात केली आहे. तर सोयाबीन तेलावरील आधारभूत आयात किंमत प्रति टन ३७ डॉलरचीने कमी केले आहेत.

यामुळे देशातील किरकोळ बाजारातही खाद्य तेलाचे दरात कपात होईल असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे, सध्या देशात खाद्य तेलाच्या किमती प्रती लिटर २०० रुपयांवर पोहचल्या आहेत. यात आयात होणाऱ्या कच्चा तेलावर लागणारे ग्राहक शुल्क आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या तेलाच्या किंमतींचा परिणाम थेट सर्व सामान्य नागरिकांना भोगावा लागत होता. मात्र सरकारने आता ग्राहक शुल्कात मोठी कपात केली आहे.

- Advertisement -

पाहा… खाद्य तेलांचे नवीन दर

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात, भारतात खाद्यतेलांच्या किंमती वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांच्या किंमतींमध्ये घसरण होत आहेत. असे स्पष्ट झाले आहे.

१) पाम तेलांची किंमत १४२ रुपये प्रतिलिटर होती ती आता १९ टक्क्यांनी कमी होऊन ११५ रुपये प्रति लिटर झाली आहे.

- Advertisement -

२) सूर्यफूल तेलाची किंमतीत १६ टक्क्यांची घसरण होऊन १५७ रुपये प्रति लिटर झाले आहे. ५ मे रोजी हीच किंमत १८८ रुपये झाली होती.

३) सोया तेलाची किंमत १६२ रुपये प्रति लिटर झाली होती पण आता मुंबईत ही किंमत १३८ रुपयांवर आली आहे.

४) मोहरी तेलाचे प्रति लिटर दर १७५ रुपये झाले होते ते आता १० टक्क्यांनी कमी होऊन १५७ रुपयांवर आले आहेत.

५) शेंगदाणा तेलाची किंमत १९० रुपये प्रतिकिलो होती, ती आता १७४ रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

६) वनस्पती तेलाची किंमत १५४ रुपयांवरून आठ टक्क्यांनी घसरून १४१ रुपयांवर आली आहे.

खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या उपापयोजना

खाद्यतेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि देशातील तेलबियांच्या उत्पादनावरही अवलंबून असतात, असे सरकारने निवेदनात म्हटले आहे. देशात तेलाचा वापर उत्पादनापेक्षा जास्त आहे. यामुळे भारत सरकारला खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी आयातीवर बराच खर्च करावा लागतो. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार मध्यम आणि दीर्घकालीन उपायांवर काम करत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -