घरदेश-विदेशहरयाणामध्ये महिलेवर आठ इसमांकडून सामूहिक बलात्कार

हरयाणामध्ये महिलेवर आठ इसमांकडून सामूहिक बलात्कार

Subscribe

हरयाणामध्ये आठ इसमांनी मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हरयाणाच्या कर्नालमध्ये एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ङघटनेबाबत आजतक या वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. सध्या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. मात्र, पीडितेची प्रकृती गंभीर आहे. पोलीस हे कृत्य करणाऱ्या नराधमांचा शोध घेत आहे. दरम्यान, हरियाणामध्ये या घटनेच्या विरोधात निदर्शने दिली जात आहेत. हरियामा नागरिकांनी पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी हरयाणा सरकारकडे केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

हरयाणाच्या कर्नाल रेल्वे स्थानकावर रात्रीच्या सुमारास एक महिला फलाटावर बसली होती. त्यावेळी तिथे एक इसम आला. त्याने तिला जेवन करुन घेण्याचा हट्ट केला. अखेर ती महिला त्याच्या अग्रहाखातीर त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. तो इसम पीडितेला एका बंद कारखान्यात घेऊन गेला. तिथे अगोदरपासून सात जण होते. या आठही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यामुळे महिला बेशूद्ध पडली. महिलेला त्या अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. पीडित महिला शुद्धिवर आल्यानंतर तिने पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी पीडितेचे लोकेशन ट्रेस केले आणि तिचा शोध घेतला. तिचा शोध लागल्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -